



आज दिनांक 17 नोव्हेंबर 2025 सोमवार हा नगरपालिका व नगर परिषद च्या नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिवस होता. महायुती तर्फे सर्व नगरसेवक पदासाठी निवडलेले सर्व उमेदवार व नगराध्यक्ष पदासाठी महायुतीचे उमेदवार सन्माननीय डॉ श्री स्वाधीन गाडेकर यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला. यावेळी कैलास बाप्पू सदाफळ, मुकुंद नाना सदाफळ,राजूभाऊ वाबळे, डॉ किसनराव गाडेकर,मुन्ना भाई शहा,राहुल सदाफळ, बोठे साहेब, अभिजित बोठे, सागर बोठे यांसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वाधीन गाडेकर यांनी सांगितले कि आज मी नगराध्यक्ष पदासाठी व माझ्या सहकार्यानी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले.जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय दादा विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनी ताई विखे पाटील व महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर व माझ्या सहकार्यनवर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ करून दाखवू.उमेदवारी साठी स्पर्धा होती परंतु संघटनेच्या उमेदवारांनी सुजय दादा यांचा निर्णय शिरसावंदय मानून आमच्या पाठीशी उभे राहिले हे मी कधीही विसरणार नाही. नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी आम्ही सर्व मोठ्या फरकाने विजयी होऊ असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.महायुतीने तसेच सुकानू समितीने आमच्या नावाची शिफारस केली त्याबद्दल त्या सर्वांचे स्वाधीन गाडेकर यांनी आभार मानले,विकास हाच या निवडणुकीचा आमचा अजेंडा राहील असेही त्यांनी सांगितले.




















