जेष्ठ समाजसेवक तुकाराम भिकाजीं चंदनशिव यांचे निधन
मुर्शदपूर :
मुर्शदपूर येथील समाजसेवक शेतकरी उद्योजक तुकाराम भिकाजीं चंदनशिव (वय ‘१०५ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. समाजसेवे सह प्रगतशील शेतकरी व उद्योजक म्हणून त्यांची ख्याती होती.त्यांच्या पश्च्यात दोन मुले,चार मुली, सुना, नातवंडे, पुतणे,पणतू असा मोठा परिवार आहे. मुर्शदपूर अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक असा सर्वच स्थरातील नागरिक व स्थानिक मोठया संख्येने हजर होते.
लक्ष्मण बागुल यांचे ते सासरे,मुक्ताबाई बागुल यांचे वडील व संदीप महाराज बागुल यांचे ते आजोबा होत.





















