उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. डॉ. उदय सामंत यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन; मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते सत्कार

शिर्डी, दि. 1 मे: महाराष्ट्र राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री मा. ना. डॉ. उदय सामंत यांनी आज शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. साईबाबांच्या मूर्तीपुढे नतमस्तक होऊन त्यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीसाठी व मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आशीर्वाद मागितले.
दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से. यांनी मंत्री महोदयांचा शाल, श्रीफळ व श्री साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला.
याप्रसंगी आमदार अमोल खताळ, माजी खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेना जिल्हा अध्यक्ष श्री कमलाकर कोते यांच्यासह संस्थानचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री डॉ. उदय सामंत यांनी यावेळी साई संस्थानच्या विविध विकास कामांची व भाविकांच्या सुविधांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून घेतली.




















