Homeताज्या बातम्याअहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर पालकमंत्र्यांच्या हस्ते...

अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात निधीचे वितरण

अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर

पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात निधीचे वितरण

अहिल्यानगर, दि. ५ :- सन २०२५-२६ च्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील ४३७ शेत विहिरींच्या दुरुस्तीसाठी शासनाने ६३ लाख १० हजार ६८३ रुपयांचा निधी मंजूर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या मदतीचे वितरण आज पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सहा शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश देऊन करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांनी उर्वरित निधीचे वाटप १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

खरीप हंगामात राज्यात व जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी गाळाने बुजल्या होत्या अथवा खचल्या होत्या. यामुळे रब्बी हंगामात पिकांच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. यावर उपाययोजना म्हणून राज्य शासनाच्या नियोजन विभागाने १३ ऑक्टोबर २०२५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार मदत जाहीर केली आहे. या निर्णयान्वये बाधित विहिरींच्या दुरुस्तीसाठी प्रत्यक्ष आलेला खर्च किंवा कमाल ३० हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल, ती मदत म्हणून देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गटविकास अधिकाऱ्यांमार्फत प्राप्त झालेल्या अहवालानुसार पहिल्या टप्प्यात ४३७ विहिरी पात्र ठरल्या आहेत. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये या निधीचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वाधिक फटका बसलेल्या जामखेड तालुक्यातील १२८ विहिरींसाठी १८ लाख ६८ हजार ७८ रुपये, शेवगावमधील १११ विहिरींसाठी १६ लाख ४८ हजार २०६ रुपये, राहुरीतील ४९ विहिरींसाठी ७ लाख ३२ हजार ८४४ रुपये, श्रीरामपूरमधील ४६ विहिरींसाठी ६ लाख ६० हजार ६०३ रुपये, नेवासा येथील ४३ विहिरींसाठी ५ लाख १० हजार ८६४ रुपये, संगमनेरमधील २१ विहिरींसाठी ३ लाख १४ हजार ७६ रुपये, कोपरगावच्या १२ विहिरींसाठी ४ लाख ४ हजार ४०० रुपये व पारनेरच्या १२ विहिरींसाठी १ लाख ७१ हजार ६१२ रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

या निधी वितरण कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी प्रशासनाला गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उर्वरित सर्व पात्र विहिरींचे प्रस्ताव तातडीने सादर करून येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व बाधित शेतकऱ्यांना रक्कमेचे वाटप पूर्ण करावे, असे सक्त निर्देश त्यांनी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी कृषी विभाग, आत्मा, पशुसंर्वधन विभाग व जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

********

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मधुर विरली: 'कडल नही करोगे क्या इसके बाद?' या जुन्या क्लिपनंतर कॉमेडियन मधुर विरलीने...

सुमारे दोन वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलेली स्टँड-अप कॉमेडी क्लिप पुन्हा चर्चेत आली आहे आणि यावेळी, त्यावर हास्याऐवजी टीका होत आहे.अलीकडच्या काही दिवसांत, सोशल...

कल्याण-नगर महामार्गावर कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला

कल्याण-नगर महामार्गावर कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला पुणे : कल्याण-नगर महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा पुण्यापासून १०५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ओतूरजवळील...

आणखी एक सुरुवात, दुसरी चूक: वैभव सूर्यवंशी श्रीलंका अ विरुद्ध २१ धावांवर बाद

वैभव सूर्यवंशी (एक्स-क्रिकबझ) वैभव सूर्यवंशीची आणखी एक निराशाजनक खेळी, कारण किशोरवयीन फलंदाजीची खळबळजनक खेळी पुन्हा एकदा चालू असलेल्या त्रि-राष्ट्रीय मालिकेत भरीव धावसंख्येमध्ये आश्वासक...

वर्ल्ड कप फुटबॉलची जादू पाहण्यासाठी चाहते कामाच्या वेळापत्रकात बदल करतात, बॉडी क्लॉक | भारत...

फुटबॉल चाहत्यांनी कोलकात्यात रोनाल्डो, नेमार आणि मेस्सीचे कट आऊट घेतले; कोझिकोडचे चाहते ब्राझील विरुद्ध मोरोक्को पाहतात. (पीटीआय आणि रॉयटर्स फोटो) क्रॉस. नियंत्रण. ड्रिबल....

“मुले रडत नाहीत” कदाचित आपल्या मुलांना आपल्या लक्षात येण्यापेक्षा जास्त त्रास होत असेल; 5...

एक लहान मुलगा एका संध्याकाळी त्याच्या आईकडे पाहतो आणि विचारतो, "आई, लोक मला सांगतात की मुले रडू नका. म्हणून मी रडलो तर मी अशक्त...

error: Content is protected !!