Homeताज्या बातम्यासाईयोग फाउंडेशन द्वारे शिवजयंती उत्साहात साजरी...- डॉ बाप्पूसाहेब पानगव्हाणे ( साईं योग...

साईयोग फाउंडेशन द्वारे शिवजयंती उत्साहात साजरी…- डॉ बाप्पूसाहेब पानगव्हाणे ( साईं योग मंडळ अध्यक्ष )

साईयोग फाउंडेशन द्वारे शिवजयंती उत्साहात साजरी…
सालाबादप्रमाणे साईयोग फाउंडेशन राहाता द्वारे आज सकाळी शिवजयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.राहाता नगरपालिकेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला.तसेच महिला सदस्या माजी नगरसेविका अनुराधा तुपे,सुष्मिता चव्हाण,कांचन बावके, निलिमा चेनुके व राजश्री बावके यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून सूत्रसंचालन केले.प्रास्ताविक करताना जेष्ठ सदस्य अरुण मोकळ यांनी प्रत्येक मातेने छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आपल्या अपत्यांवर रुजवण्याची गरज असल्याचे नमूद केले.व्याख्याते हनुमंतराव माने म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र प्रत्येक घरात वाचले गेले तर संपर्ण देशात सुसंस्कृत पिढी घडविली जाईल व कुणावरही अन्याय होणार नाही. युवा शिव व्याख्याता धनराज शेटे याने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले मावळे निवडतांना केलेले निरीक्षणाचा प्रसंग सांगताना सर्वांना मंत्रमुग्ध केले.तसेच बाल शिव व्याख्याता युवराज शेटे याने अफझल खानाच्या वधाचा प्रसंग साजर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.अर्जुन चव्हाण याने शिवाजी महाराजांची ललकारी साजर केली.
नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर यांनी मनोगत व्यक्त करताना आपण स्वतः शिवचरित्राचे वाचन केल्याने फायदा झाल्याचे नमूद करत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन नगरपालिकेचा कारभार करण्याचे अभिवचन दिले.शेवटी रविंद्र धस यांनी सर्वांचे आभार मानले.

याप्रसंगी साईयोग फाउंडेशनचे जेष्ठ मार्गदर्शक डॉ.पी.जी.गुंजाळ,नगरसेवक दशरथ तुपे,योग गुरु सुरेश भिंगारदिवे,अध्यक्ष डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे,ॲड.गोरख दंडवते, ॲड दत्तात्रय धनवटे,भाऊसाहेब बनकर,विलास वाळेकर,संजय बाबर,बबलू फटांगरे,मनोज पिपाडा,संदीप डांगे,अरविंद बावके,दीपक गाडेकर,दीपक दंडवते,प्रवीण खंडिझोड,अनिल सातव,राजेंद्र फंड,मोहन तांबे,सिताराम बावके,राजेंद्र वायकर,उमेश लुटे,सुभाष दंडवते,प्रकाश पुंड,रंगनाथ सदाफळ,शिवाजी पोटे,संतोष बावके,नारायण गाडेकर,बाळासाहेब तारगे,अण्णासाहेब कांदळकर,प्रथमेश चव्हाण,अंकुश गांधी,ज्ञानेश्वर आरणे,केतन कुंभकर्ण,ज्ञानेश्वर शेटे,अनिल पावटे सर,प्रणव लावर,कैलास चेनुके,नगरपालिका पाणीपुरवठा विभाग प्रमुख अशोक साठे,भानुदास भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गढवाल रायफल्स ते CDS पर्यंत – भारताचे नवे लष्करी प्रमुख एन एस राजा सुब्रमणि...

लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणि, PVSM, AVSM, SM, VSM (निवृत्त), यांची पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

10 मिनिटांचा दररोजचा अध्यात्मिक सराव जो अतिविचार आणि चिंता कमी करण्यास मदत करू शकतो

आधुनिक जीवनाच्या कोलाहलात, चिंता आणि अतिविचार अनेकदा आपल्यासोबत असल्यासारखे वाटते. परंतु या भावना त्यांच्या गाभ्यामध्ये खरोखरच आध्यात्मिक अनुभव आहेत. अज्ञाताची भीती, नुकसानीची भीती, एकटे...

केपीआयटी टेक्नॉलॉजीचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष रवी पंडित यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले

पुणे: मोबिलिटी टेक्नॉलॉजी फर्म केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष आणि उद्योगातील प्रमुख नेते रवी पंडित यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले,...

केकेआरच्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या आयपीएल प्लेऑफच्या आशा मावळत असताना अक्षर पटेलने 'पुढच्या वर्षाची' चर्चा...

अक्षर पटेलने कबूल केले की आयपीएल 2026 मध्ये शुक्रवारी कोलकाता नाइट रायडर्सकडून आठ विकेटने पराभव झाल्यानंतर फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही घटकांनी...

सतीसन समर्थकांनी निदर्शने केली, केरळ काँग्रेसचे नेतृत्व पुढे आले

विरोधी पक्षनेते व्हीडी साठेसन यांच्या समर्थकांनी पुढील मुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्याची मागणी करत केरळभर निदर्शने केल्याने काँग्रेस नेतृत्वाने हस्तक्षेप केला. काही कार्यकर्त्यांनी...

error: Content is protected !!