Homeताज्या बातम्याराहाता शहरातील जुनी गढी येथे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या 51 फूट उंचीच्या...

राहाता शहरातील जुनी गढी येथे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या 51 फूट उंचीच्या रावणाचे दहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न

Screenshot
Screenshot

राहाता प्रतिनिधी
समाजाला काळीमा फासणाऱ्या व सामाजिक व्यवस्था खिळखिळी करू पाहणाऱ्या जुन्या चलीरीती परंपरां बरोबरच दहशतवाद व अर्बन नक्षलवादाचे रावणदहना बरोबर दहन करून भारत मातेच्या संरक्षणासाठी आपण सर्व संघटित व कटिबद्ध असल्याचा संकल्प बाळगा असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले
शिवगर्जना नवरात्र उत्सव मंडळ व राहाता ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने राहाता शहरातील जुनी गढी येथे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या 51 फूट उंचीच्या रावणाचे दहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते बाण मारून करण्यात आले सुमारे अर्धा तास फटाक्यांच्या आतिषबाजीत 51 फुटी रावणाचे दहन सुरू होते हा प्रसंग आपल्या मोबाईल मध्ये व डोळ्यात टिपण्यासाठी महिला भगिनींसह अबाल वृद्धांनी मोठी गर्दी केली होती याप्रसंगी
शिवगर्जना नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष- भूषण कुंभकर्ण, उपाध्यक्ष- प्रणव लुटे , आनंद भातकुटे, मयूर लहामगे,राघव लावर, समर्थ कुंभकर्ण, संकेत लूटे, हर्षल लुटे, विनायक आग्रे, शंतनू विधाते, ऋषी कुंभकर्ण, साईराज लुटे, कुणाल सूर्यवंशी, आशिष लावर, क्षितिज वैजापूरकर, निशांत रूपटक्के, प्रशांत रूपाटक्के, शिवम गायकवाड, युवराज बाबर, आदर्श बागडे, समर्थ डुकरे, साई दळवी , ओम् दळवी शुभम मुर्तडक माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ भाजपा राहाता तालुकाध्यक्ष स्वाधीन गाडेकर गणेशचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ सुरेश गाडेकर संजय सदाफळ माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाबळे डॉ.संतोष मैड डॉ.किरण गोरे, भाजपा तालुका उपाध्यक्ष संतोष सदाफळ सरचिटणीस सचिन भैरवकर, राजेंद्र निकाळे, गणेश आरणे, पुनीत बर्डे, सलीम शहा, पांडुरंग तुपे भाजपा कोषाध्यक्ष पंकज कुलकर्णी दशरथ तुपे, स्वप्निल बावके मकरंद कुलकर्णी बाळासाहेब तारगे ज्ञानेश्वर गाडेकर स्वप्निल गाडेकर सोमनाथ गाडेकर संजय लावर भाऊसाहेब सदाफळ ,मनीष चितळकर,पत्रकार समीरभाई बेग व राजुभाई पठाण
आदींसह मोठ्या संख्येने मान्यवर व नागरिक उपस्थित होते

बोलताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की शिवगर्जना नवरात्र उत्सव मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे या अगोदर 14 वर्षांपूर्वी मी या ठिकाणी रावण दहन करण्यासाठी आलो होतो आज पुन्हा मला तो योग आला हे माझ्या दृष्टीने भाग्याचे आहे मात्र यापुढे दरवर्षी शिवगर्जना मित्रमंडळाने रावण दहन उत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी करावा त्यासाठी आपण सहकार्य करू हा सण म्हणजे सत्याने विजय मिळवायचा संदेश देणारा उत्सव आहे देशात काही लोक जो दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अर्बन नक्षलवाद डोके वर काढतोय या बरोबरच देशाच्या दृष्टीने धोका पोहोचू पाहणाऱ्या शक्तींची सुद्धा या रावण दहनाबरोबर दहन करायचे आहे आज विजयादशमीच्या दिनी अखंड भारतासाठी आपण संघटितपणे उभे राहण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे हा संकल्प करून भारत मातेच्या संरक्षणासाठी आपण सर्वजण कटिबद्ध असल्याचे अधोरेखित करू आज रावण दहन कार्यक्रमापूर्वी कलाकारांनी रामलीला नाटीका सादर करून उपस्थितांचे मन जिंकणाऱ्या सर्व कलाकारांचे मंत्री विखे पाटील यांनी कौतुक केले कार्यक्रमाप्रसंगी शिवगर्जना नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला तर 14 वर्षानंतर पुन्हा नवरात्र उत्सव व रावण दहन कार्यक्रमाची पुन्हा सुरुवात केल्याबद्दल नवरात्र उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्कार केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ यांनी केले तर आभार प्रदर्शन भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी मानले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

थॉमस मेर्टन कोट: थॉमस मेर्टनचे दिवसाचे कोट: “कला आपल्याला एकाच वेळी स्वतःला शोधण्यास आणि...

कला एक गहन अनुभव देते, जे एकाच वेळी आपला आत्म-जागरूक आंतरिक आवाज शांत करताना आपल्याला स्वतःचे लपलेले पैलू शोधू देते. सर्जनशील प्रयत्नांमध्ये किंवा...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून अपघाती पडल्याने तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा...

फिफा विश्वचषक 2026: सर्वाधिक चोरीला गेलेला गियर जप्त झाल्यामुळे इंग्लंडमधील उपकरणे चोरीप्रकरणी दोघांवर आरोप

कॅन्सस सिटीमध्ये फिफा विश्वचषकासाठी इंग्लिश राष्ट्रीय संघाचे सदस्य सराव करत आहेत. (एपी फोटो) युनायटेड स्टेट्समधील संघाच्या मोहिमेपूर्वी अधिकाऱ्यांनी बहुतेक हरवलेल्या वस्तू परत मिळवून,...

मॅक्रॉन चर्चा, ट्रम्प बैठक, G7 शिखर परिषद आणि तंत्रज्ञान संबंध: पंतप्रधान मोदींच्या युरोप अजेंडावर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली: फ्रान्स आणि स्लोव्हाकियाच्या भेटी आणि त्यानंतर G7 शिखर परिषदेत सहभाग असलेल्या व्यस्त युरोप दौऱ्याची सुरुवात करून पंतप्रधान नरेंद्र...

आजची ज्यू म्हण: “साठ वर्षांची स्त्री, सहा वर्षांच्या मुलीसारखी,… च्या आवाजाने धावते” |

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) वय वाढण्याबद्दल एक मनोरंजक गोष्ट आहे. लोक अगणित मार्गांनी बदलतात. त्यांचा दिनक्रम बदलतो. त्यांचे...

error: Content is protected !!