Homeताज्या बातम्यातीस वर्षांत इतके मोठे पंडाल भव्य आयोजन पाहिले नाही ; पू. पंडित...

तीस वर्षांत इतके मोठे पंडाल भव्य आयोजन पाहिले नाही ; पू. पंडित प्रदीप मिश्रा महाराज

शिर्डी, ता. 12 (प्रतिनिधी)
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील अस्तगाव माता मंदिर परिसरात जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित शिवमहापुराण कथा महोत्सवाचा भव्य शुभारंभ सोमवारी भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माच्या मंगल वातावरणात झाला. कथेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांचा महासागर उपस्थित राहिला. गेल्या तीस वर्षांत इतके मोठे, सुव्यवस्थित आणि भक्तिभावाने ओथंबलेले पंडाल भव्य आयोजन मी पाहिले नाही,अशा गौरवोद्गारांसह प्रवचनकार पू. पंडित प्रदीप मिश्रा महाराज भावूक झाले.

शिर्डी नगरीत भगवामय झळाळी पसरली होती. हर हर महादेव च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू, भक्तीभावाचा ओलावा आणि मनात शिवभक्तीची ऊर्जा दिसत होती. पू. मिश्रा महाराजांनी शिवमहापुराणातील पवित्र संदर्भ मांडत भगवान शिवाची उपासना, श्रद्धा आणि सदाचार यांचा संदेश दिला. त्यांनी शिर्डीतील आयोजन, ग्रामस्थांचा सहभाग आणि जनसेवा फाउंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

आयोजनाचे उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि भाविकांसाठी करण्यात आलेल्या सोयी-सुविधांमुळे सर्वत्र जनसेवा फाउंडेशनचे कौतुक होत आहे. पाण्याची, भोजनाची, वाहतुकीची, तसेच सुरक्षा व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी झाली असून, भाविकांना कोणतीही अडचण न येता ते कथासुखाचा आस्वाद घेत आहेत.

पहिल्याच दिवशी लाखो भक्तांनी भगवान शिवाचे दर्शन घेतले असून, पुढील चार दिवसांतही भाविकांचा प्रचंड ओघ राहील, असा आयोजकांचा अंदाज आहे. शिर्डीतील ही शिवमहापुराण कथा केवळ धार्मिक सोहळा नसून, श्रद्धा, भक्ती आणि समाजसेवेचा संगम ठरत आहे. या अध्यात्मिक पर्वामुळे शिर्डी परिसरात नवचैतन्य, आनंद आणि शिवभक्तीचा महासागर उसळला असून, हा सोहळा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

'टीएमसीच्या विभक्त गटाला कोणतीही मान्यता नाकारू': अभिषेक बॅनर्जी यांनी बंडखोरी दरम्यान लोकसभा अध्यक्षांना पत्र...

नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते अभिषेक बॅनर्जी यांनी रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून "टीएमसीच्या विभक्त गटाला मान्यता नाकारण्याचे"...

“अगदी दूरचे पाइन नट देखील खाल्ल्यास गोड लागते”

आपण आयुष्याचा बराचसा भाग वाट पाहत घालवतो. आम्ही स्थिर होण्यासाठी "योग्य वेळेची" वाट पाहतो, आम्ही लांब-अंतरातील अंतर बंद होण्याची वाट पाहतो किंवा शेवटी कोणीतरी...

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

हँडशेक पंक्ती: T20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू हस्तांदोलन करतील का? हरमनप्रीत कौरने...

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, तिचा संघ पाकिस्तानविरुद्धच्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी फक्त क्रिकेटवर केंद्रित आहे आणि संघातील चर्चा केवळ खेळाभोवतीच...

'शिस्तीने सर्व काही बदलले': जसपाल राणाचे सर्वात मोठे योगदान मनू भाकरच्या वडिलांनी आठवले

फाइल फोटोः जसपाल राणा आणि मनू भाकर (पीटीआय फोटो) नवी दिल्ली: दिग्गज नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांच्या अकाली निधनाने शोकग्रस्त, दुहेरी ऑलिम्पिक...

error: Content is protected !!