श्री साईबाबा संस्थानच्यावतीने ‘पत्रकार दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. पत्रकार दिनानिमित्त शिर्डी व परिसरातील सर्व पत्रकारांचा श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांचे हस्ते शाल, श्री साई दैनंदिनी व गुलाबपुष्प देवून सत्कार करणेत आला.

यावेळी प्रशासकिय अधिकारी संदिपकुमार भोसले, प्रसिद्धी अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी तसेच जनसंपर्क विभाग प्रसिध्दी कक्षातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.





















