विखे समर्थक असलेले वाबळे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल
राहाता प्रतिनिधी राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत यामध्ये ठीक ठिकाणी निष्ठावंत तसेच समर्थकांना काही ठिकाणी उमेदवारी दिली तर त्यांना यावेळी थांबवण्यात आले आहे.
दिनांक 17 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटची तारीख असून यामध्ये उमेदवारी मिळालेले नाराज समर्थक हे उमेदवारीच्या प्रतीक्षेत असून तर काहींनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राहाता शहरां मधील विखे समर्थक असलेले व निष्ठावान समजले जाणारे शहरातील वाबळे कुटुंबीय हे उमेदवारीच्या प्रतीक्षेत होते.
मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी काल आपल्या पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग सहा मधील स्वर्गीय सुहास वाबळे यांच्या अपक्ष उमेदवार स्नेहल नरेंद्र वाबळे थोरल्या सुनबाई यांनी आपल्या प्रभाग सहा मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विखे समर्थक असून त्यांना प्रभाग 6 मधून ना विखे यांच्याकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी नरेंद्र वाबळे यांची पत्नी स्नेहल वाबळे हिचा अपक्ष उमेदवारी दाखल करून एक प्रकारे आव्हान दिले आहे. यामुळे प्रभाग सहा मध्ये एकच खळबळ उडाली असून तर अनेकांच्या भुवया उचावले आहेत.




















