
शिर्डी, ता.६ ः- राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे नेते रमेश गोंदकर यांनी काल मुंबईत देवगिरी बंगला येथे महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रा अजित दादा पवार यांची भेट घेतली.
त्यांना श्री साईबाबांची प्रतिमा भेट देऊन साईदर्शनासाठी शिर्डीस येण्याची विनंती केली. तसेच शिर्डी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाने महायुतीच्या माध्यमातून मिळवीलेल्या यशा बाबत सविस्तर माहिती दिली.
याबाबत माहिती देताना गोंदकर म्हणाले, राष्ट्रवादी काॅग्रेसचे स्थानीक पदाधिकारी अमृत गायके, सुशांत औताडे व अमोल सुपेकर हे या भेटीच्या प्रसंगी उपस्थित होते. देवगीरी बंगल्यावर झालेल्य या भेटीपूर्वी आम्ही सर्वांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहीली.
शिर्डी नगरपरिषद शिर्डी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काॅग्रेसने उत्तम कामगीरी केली. राष्ट्रवादी काॅग्रेसचे शिर्डी शहराचे अध्यक्ष तथा शिर्डी नगरपरिषदेचे स्वच्छता व आरोग्य वैद्यकीय समितीचे सभापती दीपक भैय्या गोंदकर हे सर्वाधिक मतांनी विजयी झाले. यापुढेही शिर्डीत राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाची शक्ती वाढवीण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी एकदिलाने काम करणार आहोत. याबाबतची सविस्तर माहितीया वेळी त्यांना दिली.
—————————–




















