
महात्मा फुले 199 वा जयंती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 135 वी जयंती असा संयुक्त जयंती उत्सव हा आज राहाता शहरातील शिवाजी चौक येथे प्रतिमा पूजन करून उत्साहात पार पडला.
याप्रसंगी राहाता शहरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते. सन्माननीय ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील आणि मा.खा.डॉ. सुजयदादा विखे पाटील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष-भाजपा यांच्या मार्गदर्शनाखाली तथा समस्त माळी पंच मंडळी, राहाता, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सर्व फुलेप्रेमी तरुण व राहाता ग्रामस्थ यांच्या संयोजनातून व राहाता नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पत्रकार दिलीपभाऊ खरात,संदीप वाव्हळ,राजुभाई पठाण,ज्ञानेश्वर जोरे,नवनाथ सदाफळ हे सर्व कार्यक्रमास उपस्थित होते.शहरातील भिवसेन गाडेकर सर, राजेंद्र निकाळे सर, साहेबराव निधाने, मोहनराव सदाफळ, व नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर यांनी यावेळी महात्मा जोतिबा फुले यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी कसे ठरले व अन्यायाला वाचा फोडत गुलामगिरी मानसिकतेतून सर्वसामान्य जनतेला बाहेर काढण्यासाठी अहोरात्र जीवन व्यतीत कसे केले आणि समाजव्यवस्था कशी असावी याबद्दल प्रबोधनात्मक विचार मांडले. निकाळे सर यांनी सांगितले की यावर्षी जयंती उत्सवामध्ये छत्रपती शिवराय, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व गुरु शिष्यांचे पूजन सोबत करून यांचा जो बहुमान केला आहे त्याबद्दल उत्सव समितीचे कौतुक केले. नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी आपले विचार मांडताना शहरातील महात्मा फुले चौकातील सुशोभीकरण करण्यासाठी राहाता नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व नगरसेवक व नगरसेविका मिळून आम्ही ठराव केला असून यावर्षी 200 वी जयंती जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे कार्य करुन खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन ठरणार आहे तसेच शहरातील जातीवाचक कॉलनी, रोड व गल्ली यांची नावे थोर महापुरुष व समाजसुधारकांची नावे देऊन समतेची शिकवण जनमानसात रुजविण्याचे काम आम्ही करणार आहोत असे सांगितले.

यावेळी समस्त माळी पंच मंडळी अध्यक्ष मच्छिंद्र बनकर, उपाध्यक्ष संदीप गाडेकर व सर्व विश्वस्त, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष किशोर बोरावके सर्व पदाधिकारी, माळवदे बिल्डकॉन चे साईकुमार माळवदे यांनी तरुणांना सहयोग व प्रोत्साहन देत कार्यक्रम संपन्न करण्यास विशेष मदत केली.
सायंकाळी मिरवणुकीत छत्रपती संभाजी महाराज यांचा छावा जिवंत देखाव्याचे सादरीकरण विजय मोगले सर यांच्या टीमने केले. प्रसंगी राहाता शहरातील वीरभद्र ट्रस्ट सर्व विश्वस्त, राहता नगरपरिषद आजी माजी नगरसेवक, विविध कार्यकारी सोसायटी सर्व पदाधिकारी उपस्थित होते. नामदार साहेब यांचे स्वीय सहाय्यक श्री मधुकर चौधरी, गटनेते मुन्नाभाई शाह, उपनगराध्य विजय सदाफळ, मुकुंदनाना सदाफळ, राजेंद्र वाबळे, नंदकुमार माळवदे, कैलास बापू सदाफळ, सुयोग शेळके, ॲड.मयूर पाळंदे पप्पूभाऊ बनसोडे, चेअरमन स्वप्निल गाडेकर, प्रसाद शिवरकर, राजेंद्र कोल्हे, बाबुराव गाडेकर, भगवानराव टिळेकर, बाळासाहेब बोरकर, गणेश बनकर, शुभम मुर्तडक, साहेबराव गाडेकर, विजुनांना मोगले, रवींद्र गाडेकर, नितीन गाडेकर, प्रदीप बनकर, गोटूभाऊ बोरकर, राहुल सदाफळ, विजय गिधाड, भीमराज निकाळे आदी मान्यवर उपस्थित होते

आयोजन समिती मध्ये तरुण सदस्य माळीनगर चा राजा मित्र मंडळ, प्रसादभाऊ शिवरकर मित्र मंडळ, सावता युवा मंच, क्रांतीसुर्य मित्र मंडळ, बनकर वस्ती मित्र मंडळ, कालिका प्रतिष्ठान सेवाभावी संस्था मित्र मंडळ, हरी बाबाचा व पैंजण बाबा मळा मित्र मंडळ यांनी प्रतिमा पूजन कार्यक्रम तसेच शोभायात्रा व भव्य मिरवणूक आयोजन केले आहे असे समता परिषद शहराध्यक्ष संतोष लोंढे यांनी सांगितले. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कालिका प्रतिष्ठानचे राजेंद्र जेजुरकर यांनी केले.




















