Homeताज्या बातम्याचांगले कर्म करा, व्यसनापासून दूर राहा.नशा करायची असेल तर शिवाची करा.जीवनात यशस्वी...

चांगले कर्म करा, व्यसनापासून दूर राहा.नशा करायची असेल तर शिवाची करा.जीवनात यशस्वी होण्यासाठी आई वडील,सदगुरू आणि शिवाच्या चरणापाशी लिन होण्याची तयारी सदैव ठेवा—पंडित प्रदीप मिश्रा महाराज

राहाता दि.१४ प्रतिनिधी

संसाराचा भवसागर सांभळण्याचे काम “विठ्ठल” आणि “देवांचा देव महादेव”करीत असतो. आपण फक्त साधना करण्याची तयारी ठेवायची असते.चांगले कर्म करा, व्यसनापासून दूर राहा.नशा करायची असेल तर शिवाची करा.जीवनात यशस्वी होण्यासाठी आई वडील,सदगुरू आणि शिवाच्या चरणापाशी लिन होण्याची तयारी सदैव ठेवा असा महत्वपूर्ण उपदेश पंडीत प्रदीप मिश्रा महाराज यांनी शिवपुराण कथेच्या तिसर्या दिवशी दिला.

अस्तगाव येथील भव्य आशा शिवनगरीत लाखो भाविकांशी पंडीत प्रदीप मिश्रा महाराज यांनी पौराणिक दाखले देवून माणसांकडून त्रृटीवर नेमके पणाने बोट ठेवून त्यापासून दूर होण्याचे मौलिक मार्गदर्शन केले.

आपल्या मोबाईलची जेवढी चिंता करतो तेवढी आपण स्वताची घेत नाही.घर परीवार व्यवसाय धनदौलत वाढविण्यासाठी आपले प्रयत्न असतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण संपती वाढवतांना वय वाढविण्याचा विचार करत नाही. संपती बरोबर वय वाढवायचे असेल तर साधनेशिवाय पर्याय नाही.आयुष्यात उद्दीष्टापर्यत पोहचायचे असेल तर शिवपुराण कथा एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी विस्तृतपणे सांगितले.

कोणत्याही उद्योगाची चिंता मालकाला असते.पण चिंता हे संसाराचे सामर्थ्य होवू शकत नाही.थोडे ओझ्यातून हलके व्हायला शिका काही गोष्टी परमेश्वरावर सोडा. संत नामदेव संत मुक्ताबाई यांची उदाहरण देवून त्यांच्या मुखात फक्त विठ्ठलचे नाव असायचे. विठ्ठलच सर्वकाही करून घेतो ही त्यांची धारणा होती.त्याच प्रमाणे देवांचा देव महादेव सुध्दा चांगल्या गोष्टी घडवितात. यासाठी आपल्या कडून फक्त मंत्र साधना होण्याची जरूरी असल्याचे पंडीत प्रदीप मिश्रा यांनी भाविकांना पटवून दिले.

शिवपुराण कथा कोणाचे भविष्य सांगत नाही.पुढे काय होणार याचा दावाही करीत नाही.समाजाला ज्ञान देण्याचे काम जरूर करते.जन्माला आलेल्या कोणत्याही व्यक्तीला भोग चुकले नाहीत.आयुष्यात तुम्ही कोणाला घाबरला नाहीत तरी चालेल पण कर्माची भीती जरूर बाळगा.चांगले कर्म तुमच्याकडून घडावे आणि सर्वाचेच कल्याण होवो ही भावना तुमच्या विचारात असली पाहीजे आशी अपेक्षा पंडीतजीनी व्यक्त केली.

आयुष्यात व्यसनापासून दूर राहा असे आवाहन करून नशा करायचीच असेल तर शिवाची करा.चांगले ऐका चांगला विचार करा.आयुष्यात यश संपादन करायचे असेल आई वडील आपले सद्गगुरू आणि शिवाच्या मंदीरात लिन होण्याची तयारी सदैव ठेवा असा मौलिक सल्ला त्यांनी उपस्थित भाविकांना दिला.

कथेच्या तिसर्या दिवशी लाखो भाविकांचा जनसागर उपस्थित होता.कथेसाठी जिल्ह्यासह राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येत आहेत.कथेचा चौथा दिवस महाशिवरात्रीचा दिवस असल्याचे पंडीत मिश्रा महाराजांनी जाहीर केले असून कथेचा शेवटच्या दिवशीची वेळ सकाळी आठ ते अकरा असल्याचे महाराजांनी जाहीर केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

“अगदी दूरचे पाइन नट देखील खाल्ल्यास गोड लागते”

आपण आयुष्याचा बराचसा भाग वाट पाहत घालवतो. आम्ही स्थिर होण्यासाठी "योग्य वेळेची" वाट पाहतो, आम्ही लांब-अंतरातील अंतर बंद होण्याची वाट पाहतो किंवा शेवटी कोणीतरी...

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

हँडशेक पंक्ती: T20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू हस्तांदोलन करतील का? हरमनप्रीत कौरने...

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, तिचा संघ पाकिस्तानविरुद्धच्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी फक्त क्रिकेटवर केंद्रित आहे आणि संघातील चर्चा केवळ खेळाभोवतीच...

'शिस्तीने सर्व काही बदलले': जसपाल राणाचे सर्वात मोठे योगदान मनू भाकरच्या वडिलांनी आठवले

फाइल फोटोः जसपाल राणा आणि मनू भाकर (पीटीआय फोटो) नवी दिल्ली: दिग्गज नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांच्या अकाली निधनाने शोकग्रस्त, दुहेरी ऑलिम्पिक...

थॉमस मेर्टन कोट: थॉमस मेर्टनचे दिवसाचे कोट: “कला आपल्याला एकाच वेळी स्वतःला शोधण्यास आणि...

कला एक गहन अनुभव देते, जे एकाच वेळी आपला आत्म-जागरूक आंतरिक आवाज शांत करताना आपल्याला स्वतःचे लपलेले पैलू शोधू देते. सर्जनशील प्रयत्नांमध्ये किंवा...

error: Content is protected !!