लोणी शहरातील मध्यवस्तीत असलेले उप सरपंच चहाच्या दुकानास काल सायंकाळी आठ च्या दरम्यान आग लागल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले, शुभम घोलप (पाथरे ) व हारदे यांच्या पार्टनरशिप मध्ये उप सरपंच चहाचे दुकान आहे. सदर चे दुकान हे लोणी संगमनेर रोड ला प्रवरा बँकेच्या बाजूला असून साईछत्र जवळच अंतरावर आहे. या दुकाना शेजारीच gulf ऑइल कंपनीचे दुकान आहे. सदर दुकानाच्या मागील बाजूस तळघरात पुष्ठा व इतर साहित्य होते. वेळीच राहाता नगरपरिषद अग्निशमन वाहन पोहचले नसते तर दोन ग्यास टाक्यांचा स्फ़ोट होऊन मोठ्या प्रमाणात आगीचे स्वरूप झाले असते.
लोणी पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी त्वरित घटना स्थळी धाव घेऊन राहाता नगरपरिषद अग्निशमन दलाला कळविले व जामवास पांगविले.राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे व मिसाळ सर यांच्या मार्गदर्शना खाली अग्निशमन दलाचे प्रमुख अशोक साठे व सर्व कर्मचारी मिळून आग आटोक्यात आणली. त्यामुळे कोणत्या ही प्रकारची जीवित हानी न होता अजून मोठे नुकसान झाले नाही.






















