Homeताज्या बातम्याए आय आधारित बनावट वन्यप्राणी व्हिडिओ तयार करणाऱ्यांवर कारवाई-पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे

ए आय आधारित बनावट वन्यप्राणी व्हिडिओ तयार करणाऱ्यांवर कारवाई-पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे

एआय आधारित बनावट वन्यप्राणी व्हिडिओ तयार करणाऱ्यांवर कारवाई – पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे

अहिल्यानगर जिल्हा व्याघ्र कक्ष समितीची बैठक संपन्न

अहिल्यानगर, दि. २८ – जिल्ह्यात वाढत्या मानव–बिबट्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एआय आधारीत बनावट वन्यप्राणी व्हिडिओ तयार करून नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिल्या.

ते जिल्हा व्याघ्र कक्ष समितीच्या बैठकीत बोलत होते. बैठकीस उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, समितीचे सदस्य सचिव व विभागीय वनअधिकारी (दक्षता) नाशिक डॉ. अजित साजणे, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार, गणेश मिसाळ, सौ. अश्विनी दिघे, वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे, दादासाहेब वाघुलकर, मानद वन्यजीव रक्षक मंदार साबळे, पोलीस निरीक्षक सुधाकर कुहाडे व किरणकुमार कबाडी (स्थानिक गुन्हे शाखा) आदी उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक श्री. घार्गे म्हणाले, वनविभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पोलिसांकडून शस्त्र हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच मानव–बिबट्या संघर्षाबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिसांच्या विविध गावांतील व्हॉट्सअ‍ॅप गटांमध्ये वनअधिकाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे. वन्यप्राणी अपघात टाळण्यासाठी अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट’ ओळखणे, तसेच अस्तित्वातील आणि नव्या विहिरींना सुरक्षित कठडे बांधण्याबाबत शेतकरी व संबंधित विभागांना आवाहन करण्यात यावे. मानव–वन्यजीव संघर्षाच्या वेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची मदत तत्परतेने उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीदरम्यान क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना शस्त्र हाताळणीचे प्रशिक्षण देणे, वनविभाग–पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मॉक ड्रिल आयोजित करणे, तसेच तालुकास्तरीय समन्वय समित्या स्थापन करून त्यांची नियमित बैठक घेणे याबाबत सविस्तर चर्चा झाली.

जिल्ह्यातील अलीकडील मानव–बिबट्या संघर्षाच्या घटनांचा आढावा उपवनसंरक्षक श्री. सालविठ्ठल यांनी बैठकीत सादर केला. भविष्यातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावांवरही चर्चा झाली.

गावपातळीवर “वन पाटील” ही मानद संकल्पना राबविण्याबाबत बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. वन व वन्यजीव संवर्धनात रुची असलेल्या इच्छुक व्यक्तींना या मानद पदासाठी निवड करून शासनास प्रस्ताव पाठविण्याचे ठरविण्यात आले.

वनविभाग–पोलीस विभागातील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी बैठकीत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.

*******

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाझियाबादमधील टॉप 5 प्रीमियम निवासी क्षेत्रे

इंदिरापुरम हे गाझियाबादमधील सर्वात प्रस्थापित आणि मागणी असलेल्या निवासी परिसरांपैकी एक आहे, आधुनिक गृहनिर्माण आणि शहरी सुविधा शोधणाऱ्या खरेदीदारांमध्ये जोरदार आवाहन आहे. त्याची अपार्टमेंट...

हैदराबाद मॉडेलवर अवलंबून राहण्यासाठी पीएमसीचे ओव्हरहेड केबल्सचे धोरण

पुणे: शहरातील गोंधळलेल्या केबल नेटवर्कचे नियमन करण्यासाठी नागरी प्रशासनाने मंगळवारी मानक कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की नागरी संस्थेने हैदराबादचे मॉडेल...

IPL 2026: RR साठी जोफ्रा आर्चर इतिहासाच्या उंबरठ्यावर, 3 विकेट्सची गरज आहे…

जोफ्रा आर्चरने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी इतिहास पाहिला (प्रतिमा: आयपीएल) जोफ्रा आर्चर राजस्थान रॉयल्ससाठी इतिहास लिहिण्याच्या मार्गावर आहे, त्याला फ्रँचायझीचा सर्वकालीन आघाडीचा विकेट घेणारा...

मध्य पूर्व पुन्हा काठावर: होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये दोन जहाजांवर हल्ला

मध्य पूर्व पुन्हा काठावर: होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये दोन जहाजांवर हल्ला" decoding="async" fetchpriority="high"/>मध्य पूर्व पुन्हा काठावर: होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये दोन जहाजांवर हल्ला युनायटेड स्टेट्स आणि इराणला...

रेफ्रिजरेटरशिवाय 10 मिनिटांत टरबूज बर्फ-थंड कसे बनवायचे |

उबदार उन्हाळ्याच्या दिवशी, टरबूजच्या थंड स्लाइसचा आनंद घेण्यापेक्षा दुसरा कोणताही चांगला अनुभव नाही. दुर्दैवाने, प्रवास करणे, बाहेर पडणे किंवा वीज पुरवठा खंडित...

error: Content is protected !!