*शिर्डी व परिसरात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली आहे. काही घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना तात्पुरत्या निवाऱ्याची गरज निर्माण झाली आहे.*
*या पार्श्वभूमीवर श्री साईबाबा संस्थान प्रशासनातर्फे साई आश्रम क्रमांक दोन येथे तात्पुरती निवास व्यवस्था तसेच संस्थान प्रसादालयात भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.*
*अजूनही ज्या नागरिकांना गैरसोय भासत आहे, त्यांनी या सोयींचा लाभ घ्यावा, अशी विनंती संस्थान प्रशासनाकडून करण्यात येत आहे.*




















