Homeताज्या बातम्याराज्यातील सामाजिक ऐक्य कायम रहावे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या भूमिकेवर उपसमिती...

राज्यातील सामाजिक ऐक्य कायम रहावे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या भूमिकेवर उपसमिती काम करत आहे—-ना.राधाकृष्ण विखे पाटील तथा उपसमिती अध्यक्ष.

शिर्डी ,दि.९ प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रीमंडळ उपसमितीने अतिशय विचार करुन निर्णय केले आहेत.त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.त्यामुळे शासन निर्णय मागे घेण्याचा कोणताही प्रश्न नाही.निर्णयाबद्दल मंत्री छगन भुजबळ यांचा काही गैरसमज असेल, तर त्यांची भेट घेवून दूर करु. उपसमितीने चर्चेची दार सर्वासाठी खुली ठेवली आहेत. राज्यातील सामाजिक ऐक्य कायम रहावे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर उपसमिती काम करीत असल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा उपसमितीचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न् झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की मराठवाडा आणि सातारा गॅझेटीयर संदर्भात झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरीता विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी आज सविस्तर चर्चा करण्यात आली असून, दाखले देण्याबाबत तसेच नोंदणीची छाननी करण्याबाबत कशा पद्धतीने कार्यवाही करता येईल याचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.या बैठकीला मंत्री चंद्रकात पाटील मंत्री गिरीष महाजन मंत्री आशिष शेलार मंत्री माणिकराव कोकाटे मंत्री दादा भुसे मंत्री शिवेंद्रराजे भोसले मंत्री मकरंद पाटील यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मराठा आंदोलकांवरील गुन्हे महिना अखेरपर्यंत मागे घेण्याची प्रक्रीया राबविण्यात येणार असून, यासाठी प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडून आढावा घेवून त्याचा प्रस्ताव समितीपुढे सादर करण्यात येईल यासाठी कालबद्ध अंमलबजावणी करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. आंदोलनामध्ये मृत पावलेल्या ९६ व्यक्तींना शासन मदत देण्याबाबत निर्णय झाला असून, मागील दोन दिवसांत या रकमाही संबंधीत जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. मृत झालेल्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्यासाठी कार्यवाही सुरु करण्यात आली असून, राज्य परिवहन महामंडळ तसेच औद्योगिक विकास महामंडळामध्ये नोकरी देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याबाबतचा निर्णयही आजच्या बैठकीत करण्यात आला आहे. मुंबईमध्ये मराठा आंदोलकांच्या गाड्यांवर करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाई मागे घेण्याबाबत सविस्तर अहवाल मागविण्यात आला असून, गाड्या नेमक्या कोणत्या होत्या याची शहानिशा करुनच निर्णय करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना मंत्री छगन भुजबळ यांनी पत्राबाबत प्रतिक्रीया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, निर्णय करताना शासनावर कोणाचाही दबाव नव्हता. उपसमितीने तीन ते चार बैठका घेवून सर्व महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली केले. या संदर्भात त्यांचे काही गैरसमज असतील तर ते भेट घेवून दूर करु. याबाबत कोणताही दुराग्रह नाही. समितीने सर्वांशी चर्चा करण्याची दारे खुली ठेवली आहेत. मराठा समाजाप्रमाणेच ओबीसी समाजाकरीताही उपसमिती नेमली असून, दोन्ही समित्यांचे अध्यक्ष तसेच समित्यांच्या एकत्रित बैठका घेवून चर्चेतून मार्ग काढता येईल, या राज्याचे सामाजिक एैक्य कायम राहावे हाच प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असून, ती भूमीका घेवूनच उपसमिती काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट

(मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी १७तारखेपासून आंदोलन करण्याच्या केलेल्या वक्तव्यावर बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की,उपसमीतीने सर्व निर्णय केले आहेत.त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे.मात्र यासाठी लागाणारा कालावधी विचारात घ्यायला पाहीजे.)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

'गोलंदाजी शिबिरांना दिलासा मिळेल': केन विल्यमसनच्या निवृत्तीबाबत सचिन तेंडुलकरचा स्पष्ट निर्णय

सचिन तेंडुलकर आणि केन विल्यमसन (एक्स) न्यूझीलंड स्टारने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर केन विल्यमसनला श्रद्धांजलीच्या वाढत्या यादीत क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकर...

'मला मोठा होताना पाहिलं': कल्याण बॅनर्जींच्या 'अभिमानी' टीकेवर अभिषेक बॅनर्जींची प्रतिक्रिया

नवी दिल्ली: टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी शुक्रवारी लोकसभा खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या "अभिमानी" टिप्पणीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हटले की...

ऑप्टिकल भ्रम व्यक्तिमत्व चाचणी: स्त्री की झाडे? तुम्ही सर्जनशील किंवा संवेदनशील आहात की नाही...

काहीवेळा, आपण ज्या प्रकारे गोष्टी पाहता त्या आपल्याबद्दल आपल्या लक्षात येण्यापेक्षा अधिक सांगते. हेच एक ऑप्टिकल भ्रम व्यक्तिमत्व चाचणी इतके विचित्रपणे आकर्षक...

अहिल्यानगर एज्युकेशन ट्रस्टने पुण्यातील 2 कनिष्ठ महाविद्यालये पाच वर्षांपासून बनावट मान्यतांवर चालवली, चार गुन्हे...

एज्युकेशनल ट्रस्टने खोटे सरकारी आदेश आणि बनावट मान्यता दिल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे पुणे : विमाननगर आणि हडपसर येथे कार्यरत असलेल्या दोन कनिष्ठ...

केन विल्यमसनपासून विराट कोहलीपर्यंत: 4 दिग्गज फलंदाज जे 10K कसोटी धावांपासून कमी पडले |...

विराट कोहली आणि केन विल्यमसन (AP/PTI) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केन विल्यमसनच्या निवृत्तीने कसोटी क्रिकेटमधील सर्वात खास टप्पे: 10,000 धावांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.न्यूझीलंडच्या...

error: Content is protected !!