Homeताज्या बातम्याश्री साई-श्रद्धा ग्रामीण मूक बधिर विद्यालयात 79 वा स्वातंत्रदिन साजरा

श्री साई-श्रद्धा ग्रामीण मूक बधिर विद्यालयात 79 वा स्वातंत्रदिन साजरा

श्री साई अपंग विकास महिला मंडळ संचलित ,श्री साई-श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय (निवासी) शिर्डी येथे 15 ऑगस्ट 2025 रोजी 79 वा स्वातंत्र्य दिन सोहळा विद्यालय संस्थापक सन्माननीय माधवराव चौधरी सर लोकनियुक्त सरपंच नांदुर्खी बु. यांचे मार्गदर्शना खाली उत्साहात साजरा करण्यात आला.

स्वातंत्र्य दिना निमित्त विद्यालयातील ध्वजारोहण फिनोलेक्स कंपनीचे डिलर सन्माननीय श्री प्रशांत राजेंद्र पा.बावके,साकुरी यांचे शुभ हस्ते करण्यात आले.या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार करणार नाही करू देणार नाही अशी शपथ घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला मंडळाच्या सरचिटणीस सौ.वैशालीताई चौधरी उपस्थित होत्या,तसेच प्रमुख पाहुणे म्हणून फिनोलेक्स कंपनीचे डिलर श्री.तुषारभाऊ अरुण वावरे,शिर्डी हे उपस्थित होते. पाहुण्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाढली.” हर घर तिरंगा” या उपक्रमाच्या माध्यमातून दि. 13, 14, 15 ऑगस्ट या तीनही दिवशी कवायत संचलन सराव, चित्रकला व रांगोळी स्पर्धा पसायदानाचे सामुदायिक गायण आदी कार्यक्रमामुळे स्वातंत्र्य दिन उत्सवाचे वातावरण विद्यालयात निर्माण झाले होते. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गितावर आधारित डंबेल्स,कवायत, तालबद्ध कवायतीचे सादरीकरण करण्यात आले. विद्यालयाचे कलाशिक्षक श्री जालिंदर चासकर यांनी ” देश मेरा रंगीला ” या देशभक्तीपर गीतावर मुक-बधिर मुलांचे सुंदर समूहनृत्य सादर केले. वर्षभरात विद्यालयात पार पडलेल्या विविध स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या शुभहस्ते कौतुक करण्यात आले. यावेळी राजेंद्र गोंदकर,सुनिल कोल्हे, विलासराव औताडे,अभिषेक चौधरी,साईनाथ भाऊ गोंदकर, आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यालय मुख्याध्यापक श्री बाळासाहेब कासार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तसेच सूत्रसंचालन वि. शिक्षक श्री सोळसे बी. बी.तर आभार श्री पाटील वाय.ए.यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून या सोहळ्याची सांगता करण्यात आली.*

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

घर खरेदी करणाऱ्यांसाठी ठाण्यातील 6 सर्वात प्रतिष्ठित निवासी परिसर

माजिवडा हे प्रमुख महामार्गांच्या जंक्शनवर एक मोक्याचे ठिकाण आहे, ज्यामुळे ते ठाण्यातील सर्वोत्तम-कनेक्टेड क्षेत्रांपैकी एक आहे. हा परिसर अनेक प्रीमियम निवासी घडामोडींचे घर आहे...

पुणे टीसीएस तंत्रज्ञ आत्महत्या: 'ऑनलाइन मित्राची' वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे 48 वर्षीय टीसीएस कर्मचाऱ्याने 2...

ऑस्ट्रेलिया महिला 2.3 षटकात 9/1 | ऑस्ट्रेलिया महिला वि दक्षिण आफ्रिका महिला लाइव्ह स्कोअर,...

ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या मोहिमेची सुरुवात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गट 1 च्या लढतीने केली. सहा वेळचा चॅम्पियन...

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...

घरामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही “सन टेस्ट” केली आहे का?

भारतातील बहुतेक भागांमध्ये, पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख घरे सामान्यतः सर्वात आरामदायक मानली जातात कारण त्यांना मऊ आणि अधिक संतुलित सूर्यप्रकाश मिळतो. पूर्वाभिमुख घरे सकाळचा आल्हाददायक...

error: Content is protected !!