*विखे पाटील फाउंडेशन चे कार्य दिव्यांगांसाठी ठरले वरदान*
शिर्डी- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र,विळदघाट, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर तसेच भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम ( एलिम्को) कानपूर व एस आर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्ह्यातील अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी कृत्रिम हातपाय बसवणे व कॅलिपर्स मोजमाप आणि तात्काळ मोफत वितरण शिबिर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगरचे पालकमंत्री मा.नामदार डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांचे संकल्पनेतून तसेच मा. डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचे मार्गदर्शनातून सोमवार दिनांक २१ जुलै २०२५ रोजी श्री साई निर्माण इंग्लिश मिडीयम स्कुल, शिर्डी ता.राहाता येथे संपन्न झाले. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मा. श्री प्रशांत गायकवाड साहेब यांचे मार्गदर्शन व नियोजनातून आयोजित शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला.यावेळी राहाता तालुका व शिर्डी परिसरातून ४१ अस्थिव्यंग दिव्यांगांनी शिबिरात सहभाग नोंदवीला तर २२ लाभार्थीनी प्रत्यक्ष लाभ घेतला. सदर कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी राहात्याचे तहसीलदार मा.श्री अमोल मोरे साहेब यांनी अस्थिव्यंग दिव्यांगांना मार्गदर्शन केले.यावेळी ” डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन चे कार्य दिव्यांगांसाठी वरदान आहे. डॉ सुजय दादा विखे या फाऊंडेशन च्या माध्यमातून करीत असलेले कार्य अलौकिक असल्याचे”प्रतिपादन शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष मा. श्री कैलास बापू कोते पाटील यांनी केले.प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष मा. श्री रविंद्र गोंदकर पाटील,साई निर्माण ग्रुपचे मा.श्री विजय भाऊ कोते पाटील, मा. श्री ताराचंद कोते पाटील, नांदूर्खी बु.चे सरपंच व साई श्रद्धा ग्रामीण मुक बधिर विद्यालयाचे संस्थापक श्री माधवराव चौधरी सर,राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा. श्री ज्ञानदेवराव चौधरी पाटील, मा. श्री विलास आबा कोते पाटील, शिर्डी दिव्यांग सेल चे अध्यक्ष खंडू गोर्डे, प्रहारचे कैलास यादगुडे
तसेच पंचायत समिती शिक्षण विभाग गट साधन केंद्र कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.या शिबिराचे एक खास वैशिष्ट्य असे की, आलेल्या अस्थिव्यंग दिव्यांगांचे मोजमाप घेऊन तात्काळ त्याच ठिकाणी कृत्रिम अवयव तयार करून बसविण्यात आले.त्यामुळे दिव्यांग लाभधारकांनी समाधान व्यक्त केले.अहिल्यानगर जिल्ह्यात विविध ठिकाणी हे शिबीर राबविण्यात आले. या शिबिरात ज्या दिव्यांगांना लाभ मिळाला नसेल अशा दिव्यांगांनी दिव्यांग पुनर्वसन केंद्र, विळद घाट अहिल्यानगर येथे संपर्क करण्याचे यावेळी सांगण्यात आले.शिबीर यशस्वी होणेसाठी श्री साई श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय शिर्डीचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब कासार सर व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.




















