Homeताज्या बातम्यामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार काढलेल्या दि.25 मार्च च्या जीआर मुळे गोरगरीब...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार काढलेल्या दि.25 मार्च च्या जीआर मुळे गोरगरीब कुटुंबावरील दु:खाचे सावट दूर झाले त्यांच्या डोळ्यातील अश्रू आता आनंदाश्रूंमध्ये बदलले असून, “आपलं घर कायमचं वाचलं” ही भावना त्यांना नवसंजीवनी देणारी—डॉ राजेंद्र पिपाडा ( भाजपा नेते )

शिर्डी मतदार संघात 60-70 वर्षापासुन शासकीय जागेवर राहत असलेल्या दलित, वंचित,अल्पसंख्यांक,उपेक्षित घटकांना गेल्या 1 वर्षापासुन बेघर करण्याचा धड़ाका चालु होता तो आता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सुचनेनुसार काढलेल्या दि.25 मार्च च्या जीआर मुळे गोरगरीब कुटुंबावरील दु:खाचे सावट दूर झाले आहे. आजपर्यंत भीतीच्या छायेत जगणाऱ्या या कुटुंबांना आता नवी आशा मिळाली आहे. त्यांच्या डोळ्यातील अश्रू आता आनंदाश्रूंमध्ये बदलले असून, “आपलं घर कायमचं वाचलं” ही भावना त्यांना नवसंजीवनी देणारी ठरत आहे अशी माहिती भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी बोलताना दिली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दि. 15 मार्च रोजी शिर्डी विमानतळावर निवेदन देण्यात आले होते. या निवेदनामध्ये शिर्डी मतदारसंघात मागील 60-70 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गरीब, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांची घरे जेसीबीद्वारे पाडण्याची सुरू असलेली कारवाई तात्काळ थांबवावी, तसेच या कुटुंबांना बेघर न करता त्यांच्या डोक्यावरची छत कायम राखत त्याच जागेचा स्वतंत्र 7/12 उतारा देण्यात यावा, अशी अत्यंत जिव्हाळ्याची व मानवी संवेदनांशी निगडित मागणी करण्यात आली होती. घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात, तर ती प्रत्येक कुटुंबाची आयुष्यभराची कमाई, आठवणींचा ठेवा आणि सुरक्षिततेची हमी असते. अनेक पिढ्यांपासून राहणाऱ्या या कुटुंबांसाठी घर पाडण्याची कारवाई म्हणजे त्यांच्या अस्तित्वावरच घाला होता. अशा वेदनादायी परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रश्नाची तात्काळ दखल घेत संवेदनशीलतेने व माणुसकीच्या भावनेतून मोठा दिलासादायक निर्णय घेतला. त्या अनुषंगाने, 1 जानेवारी 2011 पूर्वी सरकारी जमिनीवर असलेल्या घरांचे अतिक्रमण नियमित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, त्यासंबंधीचा शासन निर्णय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सुचनेनुसार महसुलमंत्री श्री.बावनकुळेजी यांनी (GR) दि. 25 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निर्णयामुळे केवळ कायदेशीर मान्यता मिळणार नाही, तर हजारो कुटुंबांच्या आयुष्यात स्थैर्य, सुरक्षितता आणि सन्मानाने जगण्याचा हक्क परत मिळणार आहे. महसुल विभागाच्या 1966 कलम 40 चा वापर करुन राज्यातील मुंबई वगळुन इतर ठिकाणची 2011 पुर्वीची अतिक्रमणे नियमित होतील. केवल निवासी प्रयोजनासाठीची अतिक्रमणे नियमित करण्याती तरतुद असली अपवादा‍त्मक परिस्थितीत किराणा दुकान,मेडीकल,दळणगिरणी दवाखाने इत्यादी अतिक्रमणे नियमित कऱण्यात येतील ही अतिक्रमणे नियमानुकुल करताना मतदार याद्या,वीजबील मालमत्ता कर पावती,अतिक्रमण सर्वेक्षण नोंदवही पुरावा म्हणुन ग्राह्य धरण्यात येईल. 1 हजार 500 चौरस फुटापर्यंतची अतिक्रमणे नियमित होणा आहे. यापुढील 500 चौरस फुट क्षेत्रापर्यंत विनामुल्य असुन त्या पुढील क्षेत्रासाठी बाजारभावाच्या 10 टक्के रक्कम घेण्यात येणार आहे. यासाठी ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक तर नगरपालिका हद्दीत त्या त्या मुख्याधिकारी यांचेकडे 31 डिसेंबर 2026 पुर्वी अर्ज दाखल करावे लागणार आहे.

या लोकहितकारी, संवेदनशील व मानवतावादी निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन व कोटी-कोटी आभार व्यक्त करण्यात येत आहेत. शासनाचा हा निर्णय केवळ प्रशासनिक नाही, तर गरिबांच्या वेदना समजून घेणारा आणि त्यांना न्याय देणारा ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

घर खरेदी करणाऱ्यांसाठी ठाण्यातील 6 सर्वात प्रतिष्ठित निवासी परिसर

माजिवडा हे प्रमुख महामार्गांच्या जंक्शनवर एक मोक्याचे ठिकाण आहे, ज्यामुळे ते ठाण्यातील सर्वोत्तम-कनेक्टेड क्षेत्रांपैकी एक आहे. हा परिसर अनेक प्रीमियम निवासी घडामोडींचे घर आहे...

पुणे टीसीएस तंत्रज्ञ आत्महत्या: 'ऑनलाइन मित्राची' वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे 48 वर्षीय टीसीएस कर्मचाऱ्याने 2...

ऑस्ट्रेलिया महिला 2.3 षटकात 9/1 | ऑस्ट्रेलिया महिला वि दक्षिण आफ्रिका महिला लाइव्ह स्कोअर,...

ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या मोहिमेची सुरुवात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गट 1 च्या लढतीने केली. सहा वेळचा चॅम्पियन...

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...

घरामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही “सन टेस्ट” केली आहे का?

भारतातील बहुतेक भागांमध्ये, पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख घरे सामान्यतः सर्वात आरामदायक मानली जातात कारण त्यांना मऊ आणि अधिक संतुलित सूर्यप्रकाश मिळतो. पूर्वाभिमुख घरे सकाळचा आल्हाददायक...

error: Content is protected !!