Homeटेक्नॉलॉजीराहाता नगरपरिषद हद्दीतील संपूर्ण मिळकतींचे (इमारती व खुले भूखंड) सर्वेक्षण करण्यासाठी राहाता...

राहाता नगरपरिषद हद्दीतील संपूर्ण मिळकतींचे (इमारती व खुले भूखंड) सर्वेक्षण करण्यासाठी राहाता नगरपरिषदेच्यावतीने प्रथमच अत्याधुनिक LiDAR तंत्रज्ञानासह GIS आधारित सर्वेक्षणाचा प्रारंभ लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्या शुभहस्ते ड्रोन उडवून संपन्न

राहाता नगरपरिषद हद्दीतील संपूर्ण मिळकतींचे (इमारती व खुले भूखंड) सर्वेक्षण करण्यासाठी राहाता नगरपरिषदेच्यावतीने प्रथमच अत्याधुनिक LiDAR तंत्रज्ञानासह GIS आधारित सर्वेक्षणाचा प्रारंभ लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्या शुभहस्ते ड्रोन उडवून करण्यात आला आहे.
याप्रसंगी नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ सुजय दादा विखे पाटील यांच्या सूचनेनुसार राहाता शहरामध्ये मालमत्ता सर्वेक्षण सुरू करण्यात आहे.
या सर्वेक्षणामध्ये LiDAR तंत्रज्ञानाचा वापर प्रथमच महाराष्ट्रमध्ये राहाता नगरपरिषद करत आहे. या सर्वेक्षणामुळे शहरातील मालमत्तेची अचूक माहिती, मालमत्तांचे डिजिटल नकाशांकन होणार आहे. भविष्यातील शहर नियोजनासाठी अचूक डेटा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
यावेळी सर्वेक्षणाची माहिती देताना मुख्याधिकारी वैभव लोंढे म्हणाले की, राहाता पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या परवानगीनंतर कोअर प्रोजेक्ट इंजिनिअर्स अँड कन्सल्टंट्स प्रा. लि. अमरावती यांच्या मार्फत राहाता नगरपरिषद हद्दीतील संपूर्ण शहराचे LiDAR (Light Detection and Ranging) या प्रगत ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे हवाई छायाचित्रण करण्यात येत आहे. करमूल्यांकनाच्या कामाकरिता अचूक मोजमाप, नकाशांकन व माहिती संकलन करण्यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. शहरातील जमिनीवरील इमारती, रस्ते, मोकळी जागा, झाडे इत्यादींचे अत्यंत अचूक छायाचित्रण घेऊन नकाशांकन केले जाणार असून पारंपरिक सर्वेक्षणापेक्षा अधिक वेगवान, अचूक व पारदर्शक माहिती संकलित होणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करुन मालमत्ता सर्वेक्षणाचे काम करुन नगरपरिषद मध्ये उत्पन्नाचा अत्यंत महत्वाचा स्त्रोत मानला जाणाऱ्या कर विभागच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे तसेच मालमत्ता धारकांनी आवश्यक ती माहिती सर्वेक्षण करणा-या कर्मचारी वर्गास पुरवावी असे आवाहन करण्यात आले.
सदर ड्रोन फ्लाय कार्यक्रम
माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, नगरसेवक नितीन गाडेकर,नानासाहेब टिक्कल, कोअर प्रोजेक्ट इंजिनिअर्स अँड कन्सल्टंट्स प्रा.लि. चे संचालक सचिन तुपटकर, प्रकल्प व्यवस्थापक ऋषभ गोमासे, GIS व्यवस्थापक कार्तिक पारधी, बापू वैजापूरकर, विरेश बोठे, सुभाष कुलकर्णी, संकेत शिंदे, सचिन मोरे, रेवणनाथ शिंदे आणि नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवसाची ग्रीक म्हण: “जेव्हा तुम्ही अनेक चेरींबद्दल ऐकता, तेव्हा एक लहान टोपली धरा.” |

दिवसाची ग्रीक म्हण (AI-व्युत्पन्न प्रतिमा) जीवन, मानवी स्वभाव, नातेसंबंध आणि निर्णय घेण्याबद्दल व्यावहारिक शहाणपण देणारी ग्रीक नीतिसूत्रे शतकानुशतके पिढ्यान्पिढ्या पार केली गेली आहेत....

क्रॉसविंड्स हाताळण्यासाठी MSRDC eway च्या नवीन लिंक ब्रिजवर पवन अडथळे बसवते

टायगर व्हॅलीमध्ये पसरलेल्या 650 मीटर लांबीच्या केबल-स्टेड ब्रिजवर अडथळे उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई-पुणे...

गिल्बर्टो मोरा कोण आहे? टीन सेन्सेशन बनली सहावी सर्वात तरुण खेळाडू, त्याने मोडला फिफा...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यादरम्यान मेक्सिकोचा १७ वर्षीय गिल्बर्टो मोरा चेंडूवर नियंत्रण ठेवतो. (एपी फोटो) FIFA विश्वचषक 2026 च्या सुरुवातीच्या रात्री Estadio Azteca येथे...

'पेड्डी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8: राम चरण चित्रपटात आणखी घसरण; जगभरात जवळपास रु...

राम चरणच्या स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा 'पेड्डी'ने थिएटरमध्ये आठ दिवस पूर्ण केल्यामुळे संकलनात आणखी एक घट झाली. दमदार ओपनिंग आठवड्यानंतर, चित्रपटाची रोजची कमाई...

आजची यहुदी म्हण: “जो तुम्हाला त्याचे सर्व त्रास सांगतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका...

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) बहुतेक लोकांना असे कोणीतरी भेटले आहे.संभाषण सामान्यपणे सुरू होते. काही मिनिटांत, ते समस्यांकडे वळते:...

error: Content is protected !!