Homeताज्या बातम्यासर्वसामान्य आणि गरजू नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता राहाता...

सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता राहाता नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती अभियानाची सांगता लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्या शुभहस्ते संपन्न

सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता राहाता नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती अभियानाची सांगता लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा.खा. डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या सुचनेनुसार राहाता नगरपरिषदेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना २.०(शहरी), मिशन वात्सल्य अंतर्गत एकल महिला शिबिर, प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना आणि प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना दि. ०२ फेब्रुवारी पासून ११ फेब्रुवारी पर्यंत शहरातील सर्व प्रभागात राबविण्यात आली होती. यावेळी राहाता शहरातील गरजू नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद बघायला मिळाला.
प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये नवीन घरकुलांसाठी नोंदणी, मिशन वात्सल्य अंतर्गत एकल महिला शिबिरमध्ये एकल महिला व अनाथ बालके यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाचा लाभ मिळवून देण्याकरिता नाव नोंदणी करणे, प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत पाथविक्रेत्यांना भांडवली स्वरूपात तीन टप्प्यांमध्ये बँक कर्ज प्राप्त करण्याकरिता नोंदणी करणे, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेच्या अंतर्गत असंघटित कामगारांच्या वृद्धत्व संरक्षण व सामाजिक सुरक्षासाठी असलेल्या योजनेत नाव नोंदणी करणे याकरिता प्रभागनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपनगराध्यक्ष डॉ विजय सदाफळ, मुख्याधिकारी वैभव लोंढे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय सदाफळ, गटनेते नगरसेवक मुन्ना शहा, प्रवीण सदाफळ, अजय आग्रे, राहुल सदाफळ, दशरथ तुपे, संदीप मुर्तडक, ॲड.मयूर पाळंदे, नितीन गाडेकर, नगरसेविका पुजा गिधाड, रविना माळी, पुष्पा आरणे, अर्चना निकाळे, सविता सदाफळ, मंगल डांगे, अंजली सदाफळ, अनिता शेळके, शीतल बनकर, नीता गाडेकर, तालुका पुरवठा अधिकारी भारत खरात, माजी नगरसेवक जालिंदर आरने आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रस्त्यावर एका मोठ्या गेंडयाने लघवी केली आणि एका महिलेने जे केले ते इंटरनेट कधीही...

पहिल्या दृष्टीक्षेपात, व्हिडिओ AI-व्युत्पन्न दिसत आहे कारण दृश्य काहीसे अविश्वसनीय आहे. नेपाळमध्ये, नियंत्रित सफारी किंवा प्राणीसंग्रहालयाच्या वातावरणाच्या बाहेर, जगभरातील लोकांना गेंड्यांना वैयक्तिकरित्या...

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले आहेत, म्हणतात की आजच्या...

पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

'टीएमसीला आमदार आणि खासदार म्हणून आणखी मुली नको होत्या': महिला कोटा विधेयक अयशस्वी झाल्यानंतर...

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी महिला आरक्षण विधेयकावर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) वर आपला हल्ला तीव्र केला आणि आरोप केला की...

भारतातील गैर-मेट्रो शहरांमध्ये रिअल इस्टेटच्या वाढीला चालना देणारे 7 घटक

उदयोन्मुख शहरांमधील विस्तार हा उत्तीर्ण होण्याच्या प्रवृत्तीऐवजी दीर्घकालीन संरचनात्मक बदल दर्शवतो. घरांची वाढती मागणी, जलद शहरीकरण आणि टियर-2 आणि टियर-3 मार्केटमधील ऑफिस स्पेसच्या वाढत्या...

error: Content is protected !!