Homeताज्या बातम्याभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी...

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेवून अहील्यानगर जिल्ह्याच्या भेटीचे निमंत्रण तसेच राष्ट्रीय अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार करनार

शिर्डी दि.१२ प्रतिनिधी

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेवून अहील्यानगर जिल्ह्याच्या भेटीचे निमंत्रण तसेच राष्ट्रीय अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार समारंभास वेळ देण्याची विनंती केली.

दिल्ली येथील भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.राष्ट्रीय अध्यक्ष पदावर झालेल्या निवडीनंतर पहीलीच भेट असल्याने अध्यक्ष नितीन नबीन यांचा सत्कार करून अभिनंदन केले.सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांचे “पायोनियर” जीवनचरित्र त्यांना भेट दिले.

राज्यात नुकत्याच संपन्न झालेल्या नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीत अहील्यानगर जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मिळालेल्या विजयाची माहीती देवून पक्षाने केलेल्या कामगिरीची माहीती भेटी दरम्यान दिली.

राष्ट्रीय अध्यक्ष पदावर नितीन नबीन यांची निवड झाल्याबद्दल जिल्ह्याच्या वतीने अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करायचे आहे.याचे निमंत्रण भेटी दरम्यान दिले असून, लवकरच वेळ देण्याचे त्यांनी मान्य केल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

भाजपाच्या केंद्रीय कार्यालयात मंत्री विखे पाटील यांनी राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली त्यांनाही जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या यशाची माहीती दिली.माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर तसेच अन्य केंद्रीय पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरू असल्याने केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणार्या प्रश्नाच्या संदर्भात मंत्री विखे पाटील यांनी संरक्षण मंत्री राजनाथसिंह, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा,केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांचीही मंत्री विखे पाटील यांच्या भेटी घेवून प्रश्नाच्या संदर्भात चर्चा केली.

राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या कामास केंद्र सरकारचे पाठबळ मिळावे म्हणून केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांना मंत्री विखे पाटील यांनी विनंती केली असून प्रकल्प मार्गी लागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार करीत असलेल्या निर्णयाची माहीती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सामानात सॅटेलाइट फोन सापडल्याने दोन अमेरिकन नागरिकांना श्रीनगर विमानतळावर ताब्यात घेण्यात आले

श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ (फाइल फोटो) नवी दिल्ली: दोन अमेरिकन नागरिकांना रविवारी श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आणि नियमित तपासणीदरम्यान त्यांच्या सामानात सॅटेलाइट...

रस्त्यावर एका मोठ्या गेंडयाने लघवी केली आणि एका महिलेने जे केले ते इंटरनेट कधीही...

पहिल्या दृष्टीक्षेपात, व्हिडिओ AI-व्युत्पन्न दिसत आहे कारण दृश्य काहीसे अविश्वसनीय आहे. नेपाळमध्ये, नियंत्रित सफारी किंवा प्राणीसंग्रहालयाच्या वातावरणाच्या बाहेर, जगभरातील लोकांना गेंड्यांना वैयक्तिकरित्या...

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले आहेत, म्हणतात की आजच्या...

पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

'टीएमसीला आमदार आणि खासदार म्हणून आणखी मुली नको होत्या': महिला कोटा विधेयक अयशस्वी झाल्यानंतर...

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी महिला आरक्षण विधेयकावर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) वर आपला हल्ला तीव्र केला आणि आरोप केला की...

error: Content is protected !!