Homeउद्योगबाबाभाई यांनी भव्य कोट्यावधींची इमारत उभी केली तेव्हा मी उद्घाटनासाठी आलो नाही...

बाबाभाई यांनी भव्य कोट्यावधींची इमारत उभी केली तेव्हा मी उद्घाटनासाठी आलो नाही मात्र आज पाच दहा रुपयांच्या मँगो कँडी चा शुभारंभ करतांना मनाला मोठे समाधान लाभले—डॉ सुजयदादा विखे पाटील ( खासदार )

शिर्डीतील आइस्क्रीम व्यवसायात उत्तुंग भरारी घेत शिर्डी, महाराष्ट्रच नव्हे तर थेट परराज्यात देखील क्लासिक आइस्क्रीमच्या माध्यमातून शिर्डीचा नावलौकिक वाढविणाऱ्या हाजी बाबाभाई सय्यद,हाजी युनूस भाई शहा या शिर्डीतील दोघा मित्रांनी २००० साली छोट्याशा पत्र्याच्या शेड मधे सुरू केलेला छोटेखानी आइस्क्रीमचा व्यवसाय आज आपली मुले अजहर बाबाभाई सय्यद,मोसीन युनूस शाह यांच्या साथीने आज कोट्यावधींची उलाढाल व भव्य चार मजली इमारतीत दिमाखात उभा असलेला कारखाना सय्यद व शाह परिवाराच्या प्रामाणिक मेहनतीची साक्ष देत अनेकांना प्रेरणा देणारा ठरतोय

Screenshot

आज डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते क्लासिक आइस्क्रीमच्या नवीन मँगो कँडी या उत्पादनाचा शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे हुबेहूब आंब्याच्या आकाराची असलेली नवीन मँगो कँडी ही चक्क डॉ सुजय विखे पाटील यांनी खास बाबाभाईंना आग्रह करून बनवायला लावली असल्याचे खुद्द डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितले तर आपल्या मनोगतात याबाबतचा किस्सा देखील सांगितला…दुबईतील कतार येथे मुलीला घेऊन गेले असता इंस्टाग्राम वर चीन मध्ये बनलेली आंब्याच्या आकाराची आइस्क्रीम कँडी मोठी व्हायरल होत असल्याने सुजय दादांच्या मुलीने तीच आइस्क्रीम हवी असा हट्ट धरला असता डॉ सुजय विखे पाटील यांनी शोध शोध शोधून ती मँगो कँडी मुलीला मिळवून तर दिली मात्र आपल्या तालुक्यात सुद्धा ही मँगो कँडी तयार झाली पाहिजे असा विचार मनी आला अन् क्लासिक आइस्क्रीमचे बाबाभाई सय्यद यांना याबाबत सांगितले असता त्यांनी आज अखेर हुबेहूब जशीच्या तशी मँगो कँडी बनवत आज डॉ सुजय विखे पाटलांच्या हस्ते त्याचा शुभारंभ केला

Screenshot

यावेळी डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितले की जेव्हा केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या माध्यमातून बाबाभाई यांनी भव्य कोट्यावधींची इमारत उभी केली तेव्हा मी उद्घाटनासाठी आलो नाही मात्र आज पाच दहा रुपयांच्या मँगो कँडी चा शुभारंभ करतांना मनाला मोठे समाधान लाभत असून शिर्डी व परिसरातील युवकांनी अशा वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये पुढाकार घेत उद्योग व्यवसाय वाढवावे विखे पाटील परिवार नेहमी तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहील.

यावेळी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर,उपनगराध्यक्ष अभय भैय्या शेळके,साई संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, राहता नगरपरिषदेचे गटनेते मुन्नाभाई शाह संदीपभाऊ दंडवते ( साकुरी सरपंच )मुश्ताकभाई पटेल यासह शिर्डी नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक ग्रामस्थ आणि मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती

Screenshot
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

'फ्राँचायझीने तुम्हाला पाठिंबा दिला आहे': इरफान पठाणने एलएसजी स्टारला आयपीएल 2026 मध्ये पुढे येण्याचे...

लखनौ सुपर जायंट्सचा मयंक यादव साजरा करत आहे (पीटीआय फोटो/शैलेंद्र भोजक) भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण याने स्पष्ट केले आहे की आयपीएल 2026...

प्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉ सादेख पठाण यांची रोटरी क्लब ऑफ जामखेड अध्यक्ष पदी बिनविरोध...

  जामखेड : शहरातील प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सादेख जानमोहम्मद पठाण यांची रोटरी क्लब ऑफ जामखेडच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी...

10 दिवसांत दुसरी वेळ: 'अत्याधिक आवाज' एअर इंडिया A350 ला वळवण्यास भाग पाडते

नवी दिल्ली: बरोबर 10 दिवसांत दुस-यांदा, एअर इंडियाचे नवीन एअरबस A350 (VT-JRF) बेली होल्ड सेक्शनमध्ये अशांतता, जास्त कंपन आणि आवाजामुळे आपला लांबचा...

साई संगम सेवा भावी संस्था शिर्डी आणि आर झुनझुन वाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल...

शिर्डीत ८ वे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न शिर्डी : समाजसेवेच्या भावनेतून साई संगम सेवाभावी संस्था, शिर्डी आणि आर झुनझुनवाला शंकरा आय...

दुबई विमानतळ अपडेट 26 मार्च 2026: एअर इंडिया, एअर एशिया 32 उड्डाणे चालवणार; इंडिगो...

दुबई आणि इतर UAE राष्ट्रांमधील विमान वाहतूक मध्यपूर्वेतील सध्या सुरू असलेल्या प्रादेशिक समस्यांदरम्यान कार्यरत आहे. तथापि, विमान कंपन्या सतत वेळापत्रक समायोजित करत...

error: Content is protected !!