Homeताज्या बातम्यासर्वोच्य न्यायालयाचे सर न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा व्यक्तीवर...

सर्वोच्य न्यायालयाचे सर न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा व्यक्तीवर नसून तो भारतीय लोकशाही,संविधान आणि न्यायवेवस्थेवर झाला आहे——-प्रदीप ( पप्पू ) बनसोडे आर पी आय जिल्हाअध्यक्ष.

भ्याड हल्ल्याविरोधात संतापाची लाट — सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा राहाता आर.पी.आय. (ए) तर्फे तीव्र निषेध

भारतीय लोकशाहीचा पाया असलेल्या न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे करणारी आणि संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना नुकतीच सर्वोच्च न्यायालयात घडली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या दिशेने एका वकीलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला आणि “सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही” अशी घोषणा देत न्यायालयीन शिस्तीचा भंग केला. या भ्याड आणि अमर्याद कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करत राहाता येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) तर्फे निवेदन देण्यात आले.

राहाता पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक यांना हे निवेदन देताना आर.पी.आय. (ए) चे शहराध्यक्ष राजेंद्र पाळंदे, तालुकाध्यक्ष धनंजय निकाळे, जिल्हाध्यक्ष प्रदीप (पप्पु) बनसोडे, तसेच गणेश निकाळे आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या घटनेचा निषेध करताना प्रदीप बनसोडे यांनी आपली भावना व्यक्त केले की,
“हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून तो भारतीय लोकशाही, संविधान आणि न्यायव्यवस्थेवर झालेला आहे. अशा प्रवृत्तींना समाजात स्थान मिळू नये. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेवर गदा आणणाऱ्या आरोपीवर तात्काळ कठोर कारवाईसह देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.”

निवेदनात नमूद करण्यात आले की, या प्रकाराने केवळ न्यायालयीन व्यवस्थेचा नाही तर देशाच्या न्यायमूल्यांचा अवमान झाला आहे. म्हणून संबंधित वकीलाची वकिली रद्द करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

या घटनेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, “न्यायालय, संविधान आणि लोकशाही या त्रिसूत्रीचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरीकाने एकजुट राहून अशा विकृत विचारसरणीला विरोध केला पाहिजे,” असा ठाम संदेश या निवेदनातून देण्यात आला आहे.

राहाता येथील आर.पी.आय. (ए) पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या या निषेध निवेदनामुळे समाजात जागरूकतेची भावना निर्माण झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिला T20 विश्वचषक: डॅनी व्याट-हॉजच्या शतकामुळे इंग्लंडने श्रीलंकेवर विक्रमी विजय मिळवला

डॅनी व्याट-हॉज (इमेज क्रेडिट: T20 वर्ल्ड कप) नवी दिल्ली: डॅनी व्याट-हॉजने नाबाद शतक झळकावल्यामुळे यजमान इंग्लंडने त्यांच्या आयसीसी महिला T20 विश्वचषक 2026 च्या...

दोन वर्षांनंतर ड्रेकची घरे बाजारात विकल्यानंतर मॅथ्यू स्टॅफोर्डने $1 दशलक्ष गमावले

(गेटी द्वारे प्रतिमा: मॅथ्यू स्टॅफोर्ड आणि मिनेसोटा वायकिंग्स लोगो) मॅथ्यू स्टॅफर्ड लॉस एंजेलिसमध्ये आला आणि प्रत्येक नवीन श्रीमंत, सुपर बाउल-विजेत्या क्वार्टरबॅकने कदाचित जे...

आजची आफ्रिकन म्हण: “दोन लांब नाक असलेल्या प्रेमींना चुंबन घेणे कठीण आहे.” |

दिवसाची आफ्रिकन म्हण (गुगल मिथुनद्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) प्रत्येक म्हण प्रथम ऐकताना गंभीर किंवा शहाणे वाटेल असे नाही. काही जगतात कारण ते लोकांना...

'2 महिला सहकाऱ्यांनी तज्ञांच्या बाहेर प्रकल्प नियुक्त केले': पुणे टीसीएस तंत्रज्ञांनी मृत्यूच्या चिठ्ठीत काय...

पुणे: आयटी फर्मच्या 48 वर्षीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या दोन कर्मचाऱ्यांसह तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल...

'गोलंदाजी शिबिरांना दिलासा मिळेल': केन विल्यमसनच्या निवृत्तीबाबत सचिन तेंडुलकरचा स्पष्ट निर्णय

सचिन तेंडुलकर आणि केन विल्यमसन (एक्स) न्यूझीलंड स्टारने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर केन विल्यमसनला श्रद्धांजलीच्या वाढत्या यादीत क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकर...

error: Content is protected !!