Homeताज्या बातम्याश्री गुरुपूर्णिमा उत्सव ९ जुलै ते ११ जुलै साजरा करण्यात येईल-श्री साईबाबा...

श्री गुरुपूर्णिमा उत्सव ९ जुलै ते ११ जुलै साजरा करण्यात येईल-श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डी.

शिर्डी-
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी बुधवार दिनांक ०९ जुलै ते शुक्रवार दिनांक ११ जुलै २०२५ याकाळात श्री गुरुपौर्णिमा उत्‍सव साजरा करण्‍यात येणार आहे.
श्री साईबाबा संस्‍थाकडून १ लाख ६६ हजार २७२ भक्‍तमंडळ सभासदांना श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाच्‍या निमंत्रण पत्रिका पाठविण्‍यात आलेल्‍या असून ३ लाख ५० हजार देणगीदार साईभक्‍तांना E-mail द्वारे देखील आंमत्रित करण्‍यात आलेले आहे. श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाची तयारी पुर्ण झाली असून अमेरीका येथील दानशुर साईभक्‍त‍ श्रीमती सुब्‍बा पै यांच्‍या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात येणार आहे. तसेच उत्‍सवकाळात विविध धार्मिक व सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
श्री. गोरक्ष गाडीलकर म्‍हणाले की, गुरूशिष्‍य परंपरा फार प्राचीन आहे. आपल्‍या गुरु बद्दल कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्‍हणून साजरी केली जाते. श्री साईबाबा हयातीत असलेपासुन गुरुपौर्णिमा शिर्डीत मोठया उत्‍साहात साजरी केली जात आहे. त्‍यामुळे या दिवसाला आजही अनन्‍य साधारण महत्‍व आहे. श्री साईबाबांवर श्रध्‍दा असणारे असंख्‍य भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिर्डीला येऊन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतात व या उत्‍सवास हजेरी लावतात. याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्‍सवा निमित्‍त वेगवगळया ठिकाणांहुन येणा-या ३० पालख्‍यांनी नोंदणी केलेली आहे.
उत्‍सवात होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून दर्शनाची व्‍यवस्‍था सुखकर व्‍हावी, तसेच भाविकांचे पावसापासुन संरक्षणाकरीता मंदिर व संस्‍थान परिसरात सुमारे ६३ हजार ७०० चौ.फुट मंडप उभारण्‍यात आलेले आहेत. तसेच साईभक्‍तांच्‍या अतिरिक्‍त निवासव्‍यवस्‍थे करीता साईबाबा भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम), साईधर्मशाळा याठिकाणी सुमारे २९ हजार ५०० चौ.फुट निवासी पावसाळी मंडप, बिछायत व कनातीसह मंडपाची उभारणी करण्‍यात आलेली असून यामध्‍ये विद्युत, पाणी पुरवठा, स्‍वच्‍छतागृह व सुरक्षा व्‍यवस्‍था ठेवण्‍यात आलेली आहे. पुणे ते शिर्डी येणा-या पालख्‍यांना थांब्‍यांचे ठिकाणी साधारण ३३ हजार चौ.फुट पावसाळी मंडप उभारणेत आलेले आहे. पालख्‍या शिर्डी येथे आल्‍यानंतर पदयात्रींची साई धर्मशाळा येथे नाममात्र दरात निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे. संस्‍थानचे सर्व निवासस्‍थान येथे एकुण १७,७५९ साईभक्‍तांची निवास व्‍यवस्‍था होणार आहे. तसेच तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात २,५०० साईभक्‍तांची निवास व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे.
उत्‍सव काळात श्री साईप्रसादालयात अंदाजे ३ लाखाहून अधिक साईभक्‍त प्रसाद भोजन घेतील असे नियोजन करणेत आलेले आहे. तीन दिवस उत्‍सवात वेगवेगळे मिष्‍ठान्‍न प्रसाद भोजनात देणेत येणार आहे. दर्शनरांगेत व परिसरात भक्‍तांना चहा, कॉफी व दुध सुलभतेने मिळावे यासाठी साई कॉम्‍प्‍लेक्‍स, साईआश्रम, धर्मशाळा, भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम), व्‍दारावती भक्‍तनिवासस्‍थान तसेच साई उद्यान इमारत परिसर, नविन दर्शनरांग, शांतीनिवास इमारतीतील दर्शनरांगेत तळमाळा व पहिल्‍या माळ्यावर चहा व कॉफीची अतिरिक्‍त व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. तसेच गुरुस्‍थान मंदिरासमोर दिक्षीत वाडा, नविन दर्शनरांग, शांतीनिवास इमारत दर्शनरांग, मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडप, श्री साईआश्रम (१००० रुम) व श्री साईप्रसादालय आदी ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरु राहणार असून या ठिकाणी तातडीच्‍या वैद्यकीय सेवेसाठी रुग्‍णवाहीका ही तैनात करण्‍यात आलेल्‍या आहेत. भाविकांना श्रींच्‍या दर्शनासाठी येणे-जाणेकरीता श्री साईआश्रम, श्री साईबाबा भक्‍तनिवासस्‍थान, श्री साई धर्मशाळा व श्री साईप्रसादालय आदि ठिकाणाहुन संस्‍थानच्‍या जादा बसेसची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे.
श्रींचे दर्शनानंतर मोफत बुंदी प्रसाद देण्‍यात येतो. यावर्षी ६० क्विंटलच ३ लाख मोफत बुंदी प्रसाद पाकिटे बनविण्‍याचे नियोजन असून उत्‍सव कालावधीत भक्‍तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्‍ध व्‍हावे यासाठी विक्री करीता १५० क्विंटलचे ०४ लाख लाडूप्रसाद असे एकूण २१० क्विंटलचा बुंदी व लाडु प्रसाद बनविण्‍याचे नियोजन असून दर्शनरांग कॉम्‍प्‍लेक्‍स, श्री साईनाथ मंगल कार्यालय, गेट नंबर ४ चे जवळ, मारुती मंदिराशेजारी साईकॉम्‍प्‍लेक्‍स, श्री साईप्रसादालय, सेवाधाम इमारत व साई आश्रम धर्मशाळा आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्‍यात आलेले आहेत. तसेच आवश्‍यकता भासल्‍यास अतिरिक्‍त लाडू विक्री केंद्र उभारण्‍याचे नियोजन करण्‍यात आलेले आहे. तसेच मंदिर परिसर व शिर्डी परिसरात बंदोबस्‍त चोख ठेवण्‍यासाठी संस्‍थान सुरक्षा विभागाचे संरक्षण कर्मचारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी, शिघ्र कृतीदल पथक, बॉम्‍ब शोधक पथक तैनात करण्‍यात आले आहे. याबरोबरच श्री साईबाबा संस्‍थान, पोलिस प्रशासन व शिर्डी नगरपंचायत यांचे संयुक्‍त अतिक्रमण व दलाल प्रतिबंधक पथक ही सज्‍ज ठेवण्‍यात आलेले आहेत.
उत्‍सव कालावधीतील विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे आहे. उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी बुधवार दिनांक ०९ जुलै रोजी पहाटे ०५.१५ वा. श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वाजता श्रींची पोथी व प्रतिमा मिरवणूक, ०६.०० वा. व्‍दारकामाई मंदिरामध्‍ये‍ श्री साईसच्चरित्र ग्रंथाचे अखंड पारायणास सुरवात, ०६.२० वा. श्रींचे मंगलस्‍नान व दर्शन, सकाळी ०७.०० वा. श्रींची पाद्यपुजा, सकाळी ०९.०० ते ११.३० वा. श्री सुमित पोंदा, भोपाल यांचा श्री साई अमृत कथा कार्यक्रम होईल, दुपारी १२.३० वा. श्रींची माध्‍यान्‍ह आरती होणार आहे. दु. ०१.३० ते ०३.३० वा. सक्‍सेना बंधु दिल्‍ली यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम तर सायं.०४.०० ते ०६.०० यावेळेत ह.भ.प. संतोष तेलंग यांचा कीर्तन कार्यक्रम तर सायंकाळी ०७.०० वा. श्रींची धुपारती होईल. रात्रौ ०७.३० ते ०९.३० यावेळेत श्री विजय साखरकर, बोरीवली यांचा साईस्‍वर नृत्‍योत्‍सव हा कार्यक्रम असून रात्रौ ०९.१५ वा. श्रींच्‍या पालखीची गावातून मिरवणूक काढण्‍यात येईल. श्रींची शेजारती रात्रौ १०.०० वा. (पालखी मिरवणूक परत आल्‍यानंतर) होईल. यादिवशी अखंड पारायणासाठी व्‍दारकामाई मंदिर रात्रभर खुले राहणार आहे.
उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी,गुरुवार दिनांक १० जुलै रोजी पहाटे ०५.१५ वा. श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वा. अखंड पारायणाची समाप्‍ती होवून श्रींचे पोथी व प्रतिमा मिरवणूक होईल. सकाळी ०६.२० वा. श्रींचे मंगलस्‍नान व दर्शन. सकाळी ०७.०० वा. श्रींची पाद्यपुजा, सकाळी ०९.०० ते ११.३० यावेळेत श्री सुमित पोंदा, भोपाल यांचा श्री साई अमृत कथा कार्यक्रम तर दुपारी १२.३० वा. श्रींची माध्‍यान्‍ह आरती होणार आहे. दुपारी ०१.०० ते ०३.०० वा. यावेळेत श्री. निरज शर्मा, नवी दिल्‍ली यांचा साईभजन कार्यक्रम, दुपारी ०४.०० ते ०६.०० वा. यावेळेत ह.भ.प. सौ. वेदश्री ओक यांचा कीर्तन कार्यक्रम, तर सायं. ०७.०० वा. श्रींची धुपारती होईल. सायं. ०७.३० ते १०.०० यावेळेत श्रीमती अनुराधाजी पौडवाल, मुंबई यांचा साई संध्‍या कार्यक्रम होणार असून रात्रौ. ०९.१५ वा. श्रींचे रथाची गावातुन मिरवणूक (गुरुवार नित्‍याचे चावडी पुजन) होणार आहे. तसेच रात्रौ १०.०० ते पहाटे ०६.०० वाजेपर्यंत श्रींचे समोर इच्‍छुक कलाकारांचा हजेरी कार्यक्रम होईल. या दिवशी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहील. त्‍यामुळे दिनांक १० जुलै रोजीची नित्‍याची शेजारती व दिनांक ११ जुलै रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही.
उत्‍सवाच्‍या सांगता दिनी शुक्रवार, दिनांक ११ जुलै रोजी पहाटे ०६.०० वा. श्रींचे मंगलस्‍नान व दर्शन, सकाळी ०६.५० वा. श्रींची पाद्यपुजा, सकाळी ०७.०० वा. श्रींचे गुरुस्‍थान मंदिर येथे रुद्राभिषेक सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. सौ. प्राची व्‍यास यांचे काल्‍याचे कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम तर दुपारी १२.१० वा. श्रींची माध्‍यान्‍ह आरती होईल. दुपारी ०१.०० ते ०३.०० वा. यावेळेत श्री रोहित दुग्‍गल, श्रीरामपुर यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम, दुपारी ०४.०० ते ०६.०० वा. यावेळेत श्री हिमांशु जुनेजा, सहारणपुर यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम होणार असून सायंकाळी ०७.०० वा. श्रींची धुपारती होईल. सायं. ०७.३० ते ०९.३० वा. यावेळेत पद्मश्री मदनसिंह चौहान, रायपुर यांचा साई भजनसंध्‍या कार्यक्रम होईल तर रात्रौ १०.०० वा. श्रींची शेजारती होईल. किर्तन व निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मं‍डपाच्‍या स्‍टेजवर होणार असल्‍याचे श्री.गाडीलकर यांनी सांगितले.
उत्‍सवाचे निमित्‍ताने व्‍दारकामाई मंदिरात प्रथम दिवशी होणा-या श्रीसाईसच्‍चरित्राच्‍या अखंड पारायणामध्‍ये जे साईभक्‍त भाग घेवू इच्‍छीतात अशा साईभक्‍तांनी आपली नावे मंगळवार दिनांक ०८ जुलै रोजी दुपारी ०१.०० ते सायंकाळी ०५.३० वा. यावेळेत देणगी काऊंटर नंबर १ येथे नोंदवावीत. त्‍याच दिवशी सायंकाळी ०५.३५ वाजता समाधी मंदिरातील मुख दर्शन स्‍टेजवर चिठ्ठया काढुन पारायण करणा-यांची नावे निवडण्‍यात येतील. तसेच उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रवि‍वार दिनांक १० जुलै रोजी रात्रौ १०.०० ते ०६.०० वा. यावेळेत होणा-या कलाकारांच्‍या हजेरी कार्यक्रमासाठी इच्‍छुक कलाकारांनी आपली नावे समाधी मंदिराशेजारील अनाऊंसमेंट रुममध्‍ये त्‍याच दिवशी आगाऊ नोंदवावीत, असे सांगुन सर्व साईभक्‍तांनी या उत्‍सवास उपस्थित राहून उत्‍सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री. गाडीलकर यांनी केले आहे.
या वर्षीचा श्री गुरुपौर्णिमा उत्‍सव यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यासाठी संस्‍थानचे तदर्थ समितीच्‍या अध्‍यक्षा तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश अंजु शेंडे (सोनटक्‍के), समिती सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी डॉ.पंकज आशिया, भा.प्र.से, मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से. व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली संस्‍थानचे सर्व प्रशासकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्‍नशिल आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

'खाली घे!' केनेडी सेंटरने ट्रम्पचे नाव काढून टाकल्याने गर्दीचा जयजयकार झाला – पहा

वॉशिंग्टनमधील जॉन एफ केनेडी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या दर्शनी भागातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव काढून टाकण्याचे काम शनिवारी पूर्ण झाले....

घर खरेदी करणाऱ्यांसाठी ठाण्यातील 6 सर्वात प्रतिष्ठित निवासी परिसर

माजिवडा हे प्रमुख महामार्गांच्या जंक्शनवर एक मोक्याचे ठिकाण आहे, ज्यामुळे ते ठाण्यातील सर्वोत्तम-कनेक्टेड क्षेत्रांपैकी एक आहे. हा परिसर अनेक प्रीमियम निवासी घडामोडींचे घर आहे...

पुणे टीसीएस तंत्रज्ञ आत्महत्या: 'ऑनलाइन मित्राची' वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे 48 वर्षीय टीसीएस कर्मचाऱ्याने 2...

ऑस्ट्रेलिया महिला 2.3 षटकात 9/1 | ऑस्ट्रेलिया महिला वि दक्षिण आफ्रिका महिला लाइव्ह स्कोअर,...

ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या मोहिमेची सुरुवात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गट 1 च्या लढतीने केली. सहा वेळचा चॅम्पियन...

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...

'खाली घे!' केनेडी सेंटरने ट्रम्पचे नाव काढून टाकल्याने गर्दीचा जयजयकार झाला – पहा

वॉशिंग्टनमधील जॉन एफ केनेडी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या दर्शनी भागातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव काढून टाकण्याचे काम शनिवारी पूर्ण झाले....

घर खरेदी करणाऱ्यांसाठी ठाण्यातील 6 सर्वात प्रतिष्ठित निवासी परिसर

माजिवडा हे प्रमुख महामार्गांच्या जंक्शनवर एक मोक्याचे ठिकाण आहे, ज्यामुळे ते ठाण्यातील सर्वोत्तम-कनेक्टेड क्षेत्रांपैकी एक आहे. हा परिसर अनेक प्रीमियम निवासी घडामोडींचे घर आहे...

पुणे टीसीएस तंत्रज्ञ आत्महत्या: 'ऑनलाइन मित्राची' वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे 48 वर्षीय टीसीएस कर्मचाऱ्याने 2...

ऑस्ट्रेलिया महिला 2.3 षटकात 9/1 | ऑस्ट्रेलिया महिला वि दक्षिण आफ्रिका महिला लाइव्ह स्कोअर,...

ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या मोहिमेची सुरुवात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गट 1 च्या लढतीने केली. सहा वेळचा चॅम्पियन...

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...
error: Content is protected !!