Homeताज्या बातम्याश्रीरामपूर—( प्रतिनिधी)ईद ए मिलादुन्नबी या पवित्र दिना निमित्ताने कर्मवीर चौक मित्र मंडळ...

श्रीरामपूर—( प्रतिनिधी)ईद ए मिलादुन्नबी या पवित्र दिना निमित्ताने कर्मवीर चौक मित्र मंडळ व अल वारीस युथ फाउंडेशन संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरात तब्बल १५० हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

श्रीरामपूर (एकता न्यूज/शहर प्रतिनिधी):-आज ईद-ए-मिलादुन्नबी या पवित्र निमित्ताने कर्मवीर चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कर्मवीर चौक मित्र मंडळ व अल वारीस युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमात तब्बल १५० हून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या रक्तदान शिबिरात युवक वर्गाने मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत रक्तदान करत सामाजिक भान जपले. जोंधळे ब्लड बँक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण व्यवस्थापन हाताळले. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अल्पोपहार देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच या रक्तदान शिबिरात जमा झालेल्या रक्तापैकी ५० पिशव्या गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ही एक महत्त्वपूर्ण बाब असून, गरजू लोकांपर्यंत नि:स्वार्थ मदत पोहोचवण्याचा आमचा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
सध्या काही ठिकाणी सामाजिक कार्यक्रमाच्या नावाखाली केवळ डीजे, ढोल-ताशा, आणि लाखो रुपयांची उधळण केली जात आहे. त्या तुलनेत, आजचा हा कार्यक्रम एक सामाजिकदृष्ट्या प्रेरणादायी उदाहरण ठरला. आयोजकांनी गरजूंना मदत करण्यासाठी खऱ्या अर्थाने पैशाचे व वेळेचे मूल्य दाखवून दिले.
या उपक्रमात विविध धर्म,जाती-पंथातील लोकांनी एकत्र येत रक्तदान केले. हा शांतीचा व एकतेचा संदेश देणारा कार्यक्रम ठरला. “रक्त कोणाचेही नसते, ते फक्त जीवन वाचवते”, ही भावना लोकांच्या कृतीतून उमटत होती.
या कार्यक्रमाद्वारे कर्मवीर चौक मित्र मंडळ आणि अल वारीस युथ फाऊंडेशन ने हा कार्यक्रम म्हणजे केवळ धार्मिक उत्सव न ठरता, समाजाच्या आरोग्यासाठी दिलेलं एक योगदान आहे असा संदेश दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ऑप्टिकल भ्रम व्यक्तिमत्व चाचणी: स्त्री की झाडे? तुम्ही सर्जनशील किंवा संवेदनशील आहात की नाही...

काहीवेळा, आपण ज्या प्रकारे गोष्टी पाहता त्या आपल्याबद्दल आपल्या लक्षात येण्यापेक्षा अधिक सांगते. हेच एक ऑप्टिकल भ्रम व्यक्तिमत्व चाचणी इतके विचित्रपणे आकर्षक...

अहिल्यानगर एज्युकेशन ट्रस्टने पुण्यातील 2 कनिष्ठ महाविद्यालये पाच वर्षांपासून बनावट मान्यतांवर चालवली, चार गुन्हे...

एज्युकेशनल ट्रस्टने खोटे सरकारी आदेश आणि बनावट मान्यता दिल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे पुणे : विमाननगर आणि हडपसर येथे कार्यरत असलेल्या दोन कनिष्ठ...

केन विल्यमसनपासून विराट कोहलीपर्यंत: 4 दिग्गज फलंदाज जे 10K कसोटी धावांपासून कमी पडले |...

विराट कोहली आणि केन विल्यमसन (AP/PTI) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केन विल्यमसनच्या निवृत्तीने कसोटी क्रिकेटमधील सर्वात खास टप्पे: 10,000 धावांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.न्यूझीलंडच्या...

लष्कराने जड शस्त्रास्त्रांची मागणी केल्यानंतर जोरावर लाइट टँकला 2 वर्षांचा विलंब झाला

भारताच्या नवीन लाइट टँक जोरावरची उच्च उंचीवर यशस्वी चाचणी घेण्यात आली (फोटो: टाईम्स नाऊ) भारताचा जोरावर लाइट टँक कार्यक्रम - एक DRDO-L&T प्रयत्न...

8 खाद्यपदार्थ डॉक्टर शांतपणे सुपरमार्केटमधून खरेदी करणे टाळतात

बरेच डॉक्टर सोडा, गोड बर्फाचा चहा, बाटलीबंद फ्रूट ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्स यांना पहिली गोष्ट मानतात, कारण ते नाटकीय आहेत म्हणून नाही तर ते...

error: Content is protected !!