Homeताज्या बातम्याशिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – प्रभावती घोगरे*

शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – प्रभावती घोगरे*

*शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – प्रभावती घोगरे*

राहाता (प्रतिनिधी) : आमदार संजय गायकवाड यांच्या कथित गुंडगिरीचा तसेच धिरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध करत काँग्रेस पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राहाता येथील तहसीलदार श्री. अमोल मोरे यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस सौ. प्रभावती जनार्दन घोगरे यांनी यावेळी स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्या विषयी कोणतेही अवमानास्पद वक्तव्य सहन केले जाणार नाही. लोकप्रतिनिधींनी कायद्याचे भान ठेवून वागणे अपेक्षित असताना गुंडगिरीची भाषा वापरणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे. अशा प्रवृत्तीवर तात्काळ आळा घालून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी.”

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजात असंतोष निर्माण होण्याची शक्यता असून सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी प्रशासनाने तात्काळ व ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी ज्येष्ठ विचारवंत स्व. कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक, ज्याचे प्रकाशन प्रशांत आंबी यांनी केले आहे, ते निवेदनासह तहसीलदारांना सुपूर्द करण्यात आले. तसेच या पुस्तकासंदर्भात आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्याचाही तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी राहाता तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. पंकज लोंढे, शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले, शिमोन जगताप यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुरेश पानसरे, कानिफनाथ तांबे, बाबा शेख आदींसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

घर खरेदी करणाऱ्यांसाठी ठाण्यातील 6 सर्वात प्रतिष्ठित निवासी परिसर

माजिवडा हे प्रमुख महामार्गांच्या जंक्शनवर एक मोक्याचे ठिकाण आहे, ज्यामुळे ते ठाण्यातील सर्वोत्तम-कनेक्टेड क्षेत्रांपैकी एक आहे. हा परिसर अनेक प्रीमियम निवासी घडामोडींचे घर आहे...

पुणे टीसीएस तंत्रज्ञ आत्महत्या: 'ऑनलाइन मित्राची' वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे 48 वर्षीय टीसीएस कर्मचाऱ्याने 2...

ऑस्ट्रेलिया महिला 2.3 षटकात 9/1 | ऑस्ट्रेलिया महिला वि दक्षिण आफ्रिका महिला लाइव्ह स्कोअर,...

ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या मोहिमेची सुरुवात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गट 1 च्या लढतीने केली. सहा वेळचा चॅम्पियन...

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...

घरामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही “सन टेस्ट” केली आहे का?

भारतातील बहुतेक भागांमध्ये, पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख घरे सामान्यतः सर्वात आरामदायक मानली जातात कारण त्यांना मऊ आणि अधिक संतुलित सूर्यप्रकाश मिळतो. पूर्वाभिमुख घरे सकाळचा आल्हाददायक...

error: Content is protected !!