Homeताज्या बातम्याशासनाचे नियम धाब्यावर? राहाता शिक्षण विभागात ‘प्रभारीच स्थायी’ गटशिक्षणाधिकारी पदावर वर्षानुवर्षे तात्पुरतीच...

शासनाचे नियम धाब्यावर? राहाता शिक्षण विभागात ‘प्रभारीच स्थायी’ गटशिक्षणाधिकारी पदावर वर्षानुवर्षे तात्पुरतीच सत्ता!

शासनाचे नियम धाब्यावर? राहाता शिक्षण विभागात ‘प्रभारीच स्थायी’ गटशिक्षणाधिकारी पदावर वर्षानुवर्षे तात्पुरतीच सत्ता!

Screenshot

राहाता :
राहाता पंचायत समितीच्या शिक्षण विभागात सध्या सुरू असलेली प्रभारी व्यवस्था आता केवळ तात्पुरती राहिलेली नसून तीच स्थायी स्वरूप धारण करत असल्याचे चित्र समोर येत आहे. तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे गटशिक्षणाधिकारी पद गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी भरले गेलेले नसून एकाच अधिकाऱ्याकडे वारंवार प्रभारी (अतिरिक्त) पदभार सोपवला जात असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सध्या हे पद राजेश पावसे प्रभारी म्हणून सांभाळत आहेत. विशेष म्हणजे, त्यांचे मूळ कार्यक्षेत्र अकोला असताना प्रत्यक्षात त्यांची उपस्थिती राहाता तालुक्यातच अधिक दिसून येत असल्याची चर्चा आहे. यामुळे मूळ जबाबदारी की प्रभारी पद? असा थेट प्रश्न आता उपस्थित होत आहे.

प्रशासकीय तत्त्वांनुसार प्रभारी किंवा अतिरिक्त पदभार ही केवळ तात्पुरती व्यवस्था असते, अनेक वर्षे अशी व्यवस्था ठेवणे गैरप्रशासकीय मानले जाते, रिक्त पदे तातडीने कायमस्वरूपी भरावीत, असे स्पष्ट निर्देश शासनाने वेळोवेळी दिलेले आहेत. अशा परिस्थितीत राहाता तालुक्यात हीच व्यवस्था वर्षानुवर्षे का कायम ठेवली जात आहे? हा मूलभूत प्रश्न अधिक तीव्र होत आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून ‘प्रभारीच’ का?
स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, गटशिक्षणाधिकारी पद गेल्या कित्येक वर्षांपासून प्रभारीच चालत आहे, कायमस्वरूपी नियुक्तीबाबत कोणतीही ठोस हालचाल दिसत नाही, ही परिस्थिती केवळ प्रशासकीय त्रुटी आहे की जाणूनबुजून निर्माण केलेली यंत्रणा? असा सवाल उपस्थित होत आहे.

एकाच अधिकाऱ्याकडे इतका दीर्घकाळ अतिरिक्त पदभार का? मूळ कार्यक्षेत्र अकोल्याकडे दुर्लक्ष होत आहे का? कोणाचा आशीर्वाद किंवा दबाव या व्यवस्थेमागे आहे का? अशा चर्चांना आता उधाण आले असून प्रशासनाचे मौन या संशयाला अधिक बळ देत आहे.

गटशिक्षणाधिकारी हे तालुक्याच्या शिक्षण व्यवस्थेचे केंद्रबिंदू असते. शाळा तपासणीतील सातत्य बिघडण्याची शक्यता, शिक्षकांच्या प्रशासकीय निर्णयांमध्ये विलंब, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर अप्रत्यक्ष परिणाम, प्रभारी व्यवस्थेमुळे शिक्षण व्यवस्थेत स्थैर्याचा अभाव निर्माण होत असल्याची भीती व्यक्त होत आहे. एका शिक्षकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, प्रभारी व्यवस्थेमुळे निर्णय वेळेवर होत नाहीत, त्यामुळे शाळांवर त्याचा परिणाम होतो.

राहात्यात असे काय विशेष आहे की अधिकारी अकोला सोडून इथेच ठाण मांडून बसतात? ही प्रशासकीय गरज की कोणाच्या दबावाचे परिणाम?
हे प्रश्न आता जनतेच्या चर्चेचे विषय बनले आहेत.

राहाता तालुक्यातील नागरिक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून एकमुखाने मागणी होत आहे. गटशिक्षणाधिकारी पदावर तातडीने कायमस्वरूपी अधिकारी नेमावा, वर्षानुवर्षे चालणारी प्रभारी व्यवस्था त्वरित थांबवावी.

प्रभारी ही तात्पुरती व्यवस्था असताना राहाता पंचायत समितीत तीच कायमस्वरूपी का बनली आहे, हा प्रश्न आता टाळता येणार नाही. प्रशासनाने त्वरित भूमिका स्पष्ट करून पारदर्शक निर्णय घेतला नाही तर हा मुद्दा केवळ चर्चेत न राहता मोठ्या जनआंदोलनाचे रूप घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवसाची ग्रीक म्हण: “जेव्हा तुम्ही अनेक चेरींबद्दल ऐकता, तेव्हा एक लहान टोपली धरा.” |

दिवसाची ग्रीक म्हण (AI-व्युत्पन्न प्रतिमा) जीवन, मानवी स्वभाव, नातेसंबंध आणि निर्णय घेण्याबद्दल व्यावहारिक शहाणपण देणारी ग्रीक नीतिसूत्रे शतकानुशतके पिढ्यान्पिढ्या पार केली गेली आहेत....

क्रॉसविंड्स हाताळण्यासाठी MSRDC eway च्या नवीन लिंक ब्रिजवर पवन अडथळे बसवते

टायगर व्हॅलीमध्ये पसरलेल्या 650 मीटर लांबीच्या केबल-स्टेड ब्रिजवर अडथळे उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई-पुणे...

गिल्बर्टो मोरा कोण आहे? टीन सेन्सेशन बनली सहावी सर्वात तरुण खेळाडू, त्याने मोडला फिफा...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यादरम्यान मेक्सिकोचा १७ वर्षीय गिल्बर्टो मोरा चेंडूवर नियंत्रण ठेवतो. (एपी फोटो) FIFA विश्वचषक 2026 च्या सुरुवातीच्या रात्री Estadio Azteca येथे...

'पेड्डी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8: राम चरण चित्रपटात आणखी घसरण; जगभरात जवळपास रु...

राम चरणच्या स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा 'पेड्डी'ने थिएटरमध्ये आठ दिवस पूर्ण केल्यामुळे संकलनात आणखी एक घट झाली. दमदार ओपनिंग आठवड्यानंतर, चित्रपटाची रोजची कमाई...

आजची यहुदी म्हण: “जो तुम्हाला त्याचे सर्व त्रास सांगतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका...

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) बहुतेक लोकांना असे कोणीतरी भेटले आहे.संभाषण सामान्यपणे सुरू होते. काही मिनिटांत, ते समस्यांकडे वळते:...

error: Content is protected !!