Homeताज्या बातम्या*"शारदा शैक्षणिक संकुलात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा"*—प्रा.हनुमंत माने ( प्रख्यात...

*”शारदा शैक्षणिक संकुलात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा”*—प्रा.हनुमंत माने ( प्रख्यात वक्ते )

*”शारदा शैक्षणिक संकुलात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा”*

राहाता. जि. अहिल्यानगर
ज्येष्ठ कवी व नाटककार कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मराठी भाषेचा अभिमान, संवर्धन आणि समृद्ध साहित्यपरंपरेचा जागर यानिमित्त अधोरेखित करण्यात आला.
कार्यक्रमात मराठी भाषेचे अभ्यासक व प्रभावी वक्ते प्रा. हनुमंत माने यांनी अभ्यासपूर्ण भाषण करत कुसुमाग्रजांच्या साहित्यसंपदेचा परामर्श घेतला. त्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांमधील मानवतावादी दृष्टिकोन, सामाजिक बांधिलकी, स्वातंत्र्यप्रेम आणि भाषेची अभिजात अभिव्यक्ती यांचा सखोल ऊहापोह केला. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती या आपल्या अस्मितेच्या जिव्हाळ्याच्या घटक असल्याचे सांगत त्यांनी मराठीच्या प्रचार-प्रसारासाठी आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत योगदान देण्याचा जाणीवपूर्वक संकल्प व्यक्त केला. “मराठी भाषा ही हृदयाची भाषा आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती हेमलता गुंजाळ मॅडम होत्या. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. अशोक बोरसे, पर्यवेक्षक श्रीमती शीला संसारे व श्री. राजेंद्र देशमुख तसेच मराठी विषयाचे सर्व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अभिमन्यू सदाफळ, भाग्यश्री कोकणे, स्नेहा बिडवे, वैष्णवी वडतेले, अमृता चिकणे आदी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करत मराठी भाषेविषयीचा अभिमान प्रकट केला. सौम्या भोसले यांनी सुमधुर गीत सादर केले, तर मानसी बोबडे यांनी स्व-रचित कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मदास वसावे यांनी केले. सूत्रसंचालन भागचंद जोशी यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर आभार प्रदर्शन प्रा. बाळासाहेब दिघे यांनी केले. शारदा शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मराठी भाषा गौरव दिनाचा हा सोहळा विद्यार्थ्यांमध्ये भाषाभिमान जागवणारा आणि साहित्यपरंपरेची जाणीव दृढ करणारा ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवसाची ग्रीक म्हण: “जेव्हा तुम्ही अनेक चेरींबद्दल ऐकता, तेव्हा एक लहान टोपली धरा.” |

दिवसाची ग्रीक म्हण (AI-व्युत्पन्न प्रतिमा) जीवन, मानवी स्वभाव, नातेसंबंध आणि निर्णय घेण्याबद्दल व्यावहारिक शहाणपण देणारी ग्रीक नीतिसूत्रे शतकानुशतके पिढ्यान्पिढ्या पार केली गेली आहेत....

क्रॉसविंड्स हाताळण्यासाठी MSRDC eway च्या नवीन लिंक ब्रिजवर पवन अडथळे बसवते

टायगर व्हॅलीमध्ये पसरलेल्या 650 मीटर लांबीच्या केबल-स्टेड ब्रिजवर अडथळे उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई-पुणे...

गिल्बर्टो मोरा कोण आहे? टीन सेन्सेशन बनली सहावी सर्वात तरुण खेळाडू, त्याने मोडला फिफा...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यादरम्यान मेक्सिकोचा १७ वर्षीय गिल्बर्टो मोरा चेंडूवर नियंत्रण ठेवतो. (एपी फोटो) FIFA विश्वचषक 2026 च्या सुरुवातीच्या रात्री Estadio Azteca येथे...

'पेड्डी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8: राम चरण चित्रपटात आणखी घसरण; जगभरात जवळपास रु...

राम चरणच्या स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा 'पेड्डी'ने थिएटरमध्ये आठ दिवस पूर्ण केल्यामुळे संकलनात आणखी एक घट झाली. दमदार ओपनिंग आठवड्यानंतर, चित्रपटाची रोजची कमाई...

आजची यहुदी म्हण: “जो तुम्हाला त्याचे सर्व त्रास सांगतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका...

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) बहुतेक लोकांना असे कोणीतरी भेटले आहे.संभाषण सामान्यपणे सुरू होते. काही मिनिटांत, ते समस्यांकडे वळते:...

error: Content is protected !!