Homeताज्या बातम्याशब्दांचा सन्मान, सत्याची पूजा, साईनगरीत ‘पत्रकार दिन’ भावनिक वातावरणात साजरा-गोरक्ष गाडिलकर (...

शब्दांचा सन्मान, सत्याची पूजा, साईनगरीत ‘पत्रकार दिन’ भावनिक वातावरणात साजरा-गोरक्ष गाडिलकर ( मुख्य कार्यकारी अधिकारी शिर्डी संस्थान )

शब्दांचा सन्मान, सत्याची पूजा, साईनगरीत ‘पत्रकार दिन’ भावनिक वातावरणात साजरा-गोरक्ष गाडिलकर ( मुख्य कार्यकारी अधिकारी शिर्डी संस्थान )

समाजाचा आरसा असलेल्या पत्रकारितेचा सन्मान करत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री साईबाबा संस्थानच्यावतीने ‘पत्रकार दिन’ अत्यंत आत्मीय, भावनिक आणि सन्मानपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सत्य, निर्भीडता आणि समाजहित या मूल्यांवर अविरत काम करणाऱ्या पत्रकारांच्या योगदानाची जाणीव ठेवत संस्थानने पत्रकारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या प्रसंगी शिर्डी व परिसरातील पत्रकारांचा श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते शाल, श्री साई दैनंदिनी व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान केवळ औपचारिक नव्हता, तर समाजासाठी झटणाऱ्या पत्रकारांच्या कार्याला दिलेली मनापासूनची दाद होती.

पत्रकार दिनानिमित्त उपस्थित सर्व पत्रकारांना श्री साईबाबा यांच्या पवित्र समाधीचे दर्शन घडवून आणण्यात आले. साईंच्या चरणी नतमस्तक होताना अनेक पत्रकारांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे व समाधानाचे भाव दिसून आले. शब्दांची साधना करणाऱ्या पत्रकारांसाठी हे क्षण अत्यंत भावस्पर्शी ठरले.

या वेळी प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रसिद्धी अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी तसेच जनसंपर्क विभाग व प्रसिद्धी कक्षातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी मिळून पत्रकारांच्या समाजातील भूमिकेचा गौरव करत साईनगरीतील पत्रकारितेला बळ देण्याचा संदेश दिला.

सत्यासाठी उभे राहणाऱ्या लेखणीचा सन्मान करणारा हा कार्यक्रम पत्रकारांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील, असा ठाम विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. साईबाबांच्या छायेखाली पत्रकारितेच्या मूल्यांना मिळालेला हा सन्मान म्हणजेच सेवा, सत्य आणि संवेदनशीलतेचा संगम असल्याचे भावनिक चित्र या पत्रकार दिनाने उभे केले.
या प्रसंगी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रमोद आहेर, रामकृष्ण लोंढे ( राहाता प्रेस क्लब अध्यक्ष )सतीश वैजापूरकर, डॉ जयंत गायकवाड,भोसले सर,सीताराम चांडे, किशोर पाटणी, राजेंद्र भुजबळ, मनोज गाडेकर,सचिन बनसोडे,राजुभाई पठाण,नितीन गमे,राजकुमार जाधव,नितीन ओझा,नानासाहेब शेळके,कैलास विखे,राहुल कोळगे,रवींद्र महाले, कुणाल जमदाडे, सुरेश मुळे, पंढरी पगार, प्रशांत अग्रवाल, राजकुमार गडकरी, प्रशांत शर्मा, हरीश दिमोटे, अमोल वाघमारे, राजेंद्र दुनबळे,ग्न्यानेश्वरी गांदेकर,राजेंद्र चिंधे, सुनील दवंगे, बाळासाहेब भांड, मोबीन खान आदींसह बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.

Screenshot
Screenshot
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एम्पायर स्टेट बिल्डिंगने अमेरिकेच्या मैलाचा दगड वर्षातील प्रत्येक प्रवाशाच्या न्यूयॉर्क प्रवासाचा अव्वल का असावा...

एम्पायर स्टेट बिल्डिंग, न्यूयॉर्क शहराच्या क्षितिजावर उंच, जगातील सर्वात ओळखण्यायोग्य आर्किटेक्चरल लँडमार्क्सपैकी एक आहे आणि ट्रिप ॲडव्हायझरच्या 2026 ट्रॅव्हलर्स चॉईस अवॉर्ड्समध्ये यूएस...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

महिला T20 विश्वचषक: डॅनी व्याट-हॉजच्या शतकामुळे इंग्लंडने श्रीलंकेवर विक्रमी विजय मिळवला

डॅनी व्याट-हॉज (इमेज क्रेडिट: T20 वर्ल्ड कप) नवी दिल्ली: डॅनी व्याट-हॉजने नाबाद शतक झळकावल्यामुळे यजमान इंग्लंडने त्यांच्या आयसीसी महिला T20 विश्वचषक 2026 च्या...

दोन वर्षांनंतर ड्रेकची घरे बाजारात विकल्यानंतर मॅथ्यू स्टॅफोर्डने $1 दशलक्ष गमावले

(गेटी द्वारे प्रतिमा: मॅथ्यू स्टॅफोर्ड आणि मिनेसोटा वायकिंग्स लोगो) मॅथ्यू स्टॅफर्ड लॉस एंजेलिसमध्ये आला आणि प्रत्येक नवीन श्रीमंत, सुपर बाउल-विजेत्या क्वार्टरबॅकने कदाचित जे...

आजची आफ्रिकन म्हण: “दोन लांब नाक असलेल्या प्रेमींना चुंबन घेणे कठीण आहे.” |

दिवसाची आफ्रिकन म्हण (गुगल मिथुनद्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) प्रत्येक म्हण प्रथम ऐकताना गंभीर किंवा शहाणे वाटेल असे नाही. काही जगतात कारण ते लोकांना...

error: Content is protected !!