Homeआरोग्यप्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉ सादेख पठाण यांची रोटरी क्लब ऑफ जामखेड अध्यक्ष...

प्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉ सादेख पठाण यांची रोटरी क्लब ऑफ जामखेड अध्यक्ष पदी बिनविरोध निवड

जामखेड : शहरातील प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सादेख जानमोहम्मद पठाण यांची रोटरी क्लब ऑफ जामखेडच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी प्रफुल सोळंकी, सचिवपदी अरुण उगले, कोषाध्यक्षपदी विकास पवळ यांची निवड झाली आहे. सल्लागार म्हणून डॉ. प्रशांत गायकवाड, इव्हेंट मॅनेजमेंट प्रमुख मयूर भोसले, प्रसिद्धी प्रमुख धनराज पवार, आरोग्य व महिला प्रतिनिधी डॉ. विद्या तोंडे यांच्यासह कार्यकारी सभासद म्हणून डॉ. सुशिल पन्हाळकर, डॉ. विकी दळवी, संभाजी मुळे व विजय पवार यांचीही निवड झाली आहे.

डॉ. पठाण यांचा जन्म सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात झाला असून त्यांचे बालपण नाळवंडी व डोंगरकिन्ही या ग्रामीण भागात गेले. त्यामुळे तळागाळातील नागरिकांशी त्यांची घट्ट नाळ जुळली आहे. वैद्यकीय सेवेतून गरजू रुग्णांना मदत करण्याची त्यांची जाणीव सातत्याने दिसून येते.

सन २००९ पासून त्यांनी जामखेड येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. कोविड काळात त्यांनी अनेक रुग्णांना माफक दरात व काहींना मोफत उपचार देत महत्त्वाची सेवा बजावली. तसेच रुग्णवाहिका मोफत उपलब्ध करून देणे, निराधार मृतांच्या अंत्यविधीसाठी स्वखर्चाने मदत करणे अशा विविध उपक्रमांतून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. समाजजागृतीपर लेखनातूनही ते सक्रिय आहेत.

सन २०१९ पासून ते जामखेड तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे सचिव म्हणून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात संस्थेला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्या एकूण कार्याचा गौरव म्हणून २०२६-२७ या वर्षासाठी त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.तसेच डॉ सादेख पठाण समाजसेवक,फंदाबी हायस्कूल नाळवंडी चे संस्थापक श्री जानूभाई पठाण यांचे चिरंजीव,डॉ इकबाल पठाण ( सरपंच नाळवंडी )यांचे बंधू व पत्रकार राजुभाई पठाण यांचे पुतणे आहेत.

Screenshot
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ऑस्ट्रेलिया महिला 2.3 षटकात 9/1 | ऑस्ट्रेलिया महिला वि दक्षिण आफ्रिका महिला लाइव्ह स्कोअर,...

ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या मोहिमेची सुरुवात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गट 1 च्या लढतीने केली. सहा वेळचा चॅम्पियन...

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...

घरामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही “सन टेस्ट” केली आहे का?

भारतातील बहुतेक भागांमध्ये, पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख घरे सामान्यतः सर्वात आरामदायक मानली जातात कारण त्यांना मऊ आणि अधिक संतुलित सूर्यप्रकाश मिळतो. पूर्वाभिमुख घरे सकाळचा आल्हाददायक...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

'कोणालाही हारलो, पण पाकिस्तानला नाही': जेमिमाह रॉड्रिग्स IND vs PAK महिला T20 विश्वचषक सलामीच्या...

जेमिमाह रॉड्रिग्ज (पीटीआय फोटो/शैलेंद्र भोजक) नवी दिल्ली: भारताची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज हिने रविवारी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या उभय...

error: Content is protected !!