Homeताज्या बातम्याप्रभावती घोगरे यांची ठाम भूमिका : ओंकार गायकवाड मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी...

प्रभावती घोगरे यांची ठाम भूमिका : ओंकार गायकवाड मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा; अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाईची मागणी

प्रभावती घोगरे यांची ठाम भूमिका : ओंकार गायकवाड मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा; अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाईची मागणी
राहाता | प्रतिनिधी

राहाता येथील १३ वर्षीय ओंकार गायकवाड यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला असून या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार हा प्रकार केवळ अपघात नसून घात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रभावती घोगरे यांनी गायकवाड कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले. त्यांनी कुटुंबीयांचे दुःख समजून घेत त्यांना धीर दिला आणि न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
घोगरे यांनी यावेळी पोलीस प्रशासनाकडे ठोस मागण्या मांडत या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी तात्काळ करण्यात यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, असे स्पष्टपणे सांगितले. तसेच परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर त्वरित बंदी घालून नशेखोर व गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आणणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यासोबतच राहाता तालुक्यात वाढत चाललेली गुंडगिरी, दहशतीचे वातावरण आणि असामाजिक घटकांचा वाढता प्रभाव याकडेही त्यांनी गांभीर्याने लक्ष वेधले. कायदा व सुव्यवस्थेचा धाक कमी होत असल्याची चिंता व्यक्त करत राज्यकर्ते व पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी त्यांनी केली.

कायदा व सुव्यवस्था बळकट ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेने अधिक सतर्क राहून नियमित गस्त वाढवावी, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशीही मागणी त्यांनी केली.

या भेटीदरम्यान धनंजय भाऊ गाडेकर, उत्तमराव मते, गणेश सोमवंशी यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने या घटनेची पारदर्शक चौकशी व्हावी आणि कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी केली.

दरम्यान, या घटनेमुळे राहाता परिसरात शोककळा पसरली असून, सत्य समोर येईपर्यंत नागरिकांचे लक्ष या प्रकरणाकडे लागून राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवसाची ग्रीक म्हण: “जेव्हा तुम्ही अनेक चेरींबद्दल ऐकता, तेव्हा एक लहान टोपली धरा.” |

दिवसाची ग्रीक म्हण (AI-व्युत्पन्न प्रतिमा) जीवन, मानवी स्वभाव, नातेसंबंध आणि निर्णय घेण्याबद्दल व्यावहारिक शहाणपण देणारी ग्रीक नीतिसूत्रे शतकानुशतके पिढ्यान्पिढ्या पार केली गेली आहेत....

क्रॉसविंड्स हाताळण्यासाठी MSRDC eway च्या नवीन लिंक ब्रिजवर पवन अडथळे बसवते

टायगर व्हॅलीमध्ये पसरलेल्या 650 मीटर लांबीच्या केबल-स्टेड ब्रिजवर अडथळे उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई-पुणे...

गिल्बर्टो मोरा कोण आहे? टीन सेन्सेशन बनली सहावी सर्वात तरुण खेळाडू, त्याने मोडला फिफा...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यादरम्यान मेक्सिकोचा १७ वर्षीय गिल्बर्टो मोरा चेंडूवर नियंत्रण ठेवतो. (एपी फोटो) FIFA विश्वचषक 2026 च्या सुरुवातीच्या रात्री Estadio Azteca येथे...

'पेड्डी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8: राम चरण चित्रपटात आणखी घसरण; जगभरात जवळपास रु...

राम चरणच्या स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा 'पेड्डी'ने थिएटरमध्ये आठ दिवस पूर्ण केल्यामुळे संकलनात आणखी एक घट झाली. दमदार ओपनिंग आठवड्यानंतर, चित्रपटाची रोजची कमाई...

आजची यहुदी म्हण: “जो तुम्हाला त्याचे सर्व त्रास सांगतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका...

दिवसाची ज्यू म्हण (Google Gemini द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) बहुतेक लोकांना असे कोणीतरी भेटले आहे.संभाषण सामान्यपणे सुरू होते. काही मिनिटांत, ते समस्यांकडे वळते:...

error: Content is protected !!