निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ‘नवराष्ट्र’चे राहाता तालुका प्रतिनिधी समीरभाई बेग यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

राहाता, दि. १५ मे :
सत्यासाठी झटणारी निर्भीड लेखणी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढणारा पत्रकार असा परिचय निर्माण करणारे ‘नवराष्ट्र’ दैनिकाचे राहाता तालुका प्रतिनिधी समीरभाई बेग यांचा आज वाढदिवस ठिकठिकाणी उत्साहात साजरा होत असून विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील अन्याय, भ्रष्टाचार, नागरिकांच्या समस्या आणि दुर्लक्षित विषय प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी शस्त्र आहे, हे समीरभाई बेग यांनी आपल्या निर्भीड आणि तिखट लेखणीतून वेळोवेळी सिद्ध केले आहे. सत्तेला न घाबरता, कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी नेहमीच समाजहिताची भूमिका मांडली आहे.
राहाता तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि प्रशासकीय विषयांवर त्यांनी केलेले लेखन नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांच्या बातम्यांमधून केवळ माहितीच नाही तर समाजप्रबोधनाची ताकदही दिसून येते. सामान्य नागरिकांच्या वेदना, शेतकऱ्यांचे प्रश्न, कायदा-सुव्यवस्थेचे मुद्दे तसेच सामाजिक अन्यायाविरोधातील त्यांची भूमिका ही पत्रकारितेतील प्रामाणिकपणाचे उदाहरण मानली जाते.
सत्य, निष्ठा आणि समाजसेवा या त्रिसूत्रीवर उभी असलेली त्यांची पत्रकारिता आज अनेक तरुण पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राहाता तालुक्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, मित्रपरिवार व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
समाजासाठी लढणारी लेखणी अशीच धारदार राहो, उत्तम आरोग्य, निरोगी दीर्घायुष्य आणि यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

शिर्डी आवाज न्यूज परिवाराकडूनही निर्भीड पत्रकार समीरभाई बेग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
यावेळी मनसे तालुका अध्यक्ष गणेश जाधव सर,मनसे शिर्डी शहर अध्यक्ष प्रशांत वाकचौरे,राहता नगरपरिषद नगरसेवक व गटनेता हाजी शफीक ( मुन्नाभाई )शहा,पत्रकार राजूभाई पठाण,मुश्ताकभाई शहा,नेवासा व श्रीरामपूर येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते,बंडूनाना वाबळे,हेमंत आणप सर,पत्रकार राहुल भाऊ फुंदे,इलियासभाई शहा टेलर,गुलशेरभाई,फिरोजभाई शेख,इनामदार भाई,अन्सारभाई शेख,जाधव सर इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















