Homeताज्या बातम्यानिधीची उपलब्धता करून दुष्काळी भागात जलक्रांती आणणार——डॉ सुजय विखे पाटील

निधीची उपलब्धता करून दुष्काळी भागात जलक्रांती आणणार——डॉ सुजय विखे पाटील

निधीची उपलब्धता करून दुष्काळी भागात जलक्रांती आणणार-डाॅ विखे पाटील

अठरा वर्षात त्यांनी फक्त पाच कोटी खर्च केले.

संगमनेर दि.६ (प्रतिनिधी)

त्यांनी अठरा वर्षात फक्त ५कोटी रुपये खर्च केले.पुढच्या अडीच वर्षात जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आ.अमोल खताळ यांच्या माध्यमातून २५कोटी रुपयांच्या विकास कामाचे नियोजन करून दुष्काळी भागाला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न आमचा असेल आशी ग्वाही पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली.

भोजापूर चारीचा जलपूजन सोहळा नान्नज दुमाला येथे डॉ सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यानिमित्ताने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाला सौ. नीलमताई खताळ, माजी तालुकाध्यक्ष भीमराव चतर, शिवसेनेचे विठ्ठलराव घोरपडे संदीप देशमुख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व हजारो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले,४० वर्ष सत्तेत राहून पाणी न आणणाऱ्यांना जनतेनं बाजूला केलं आणि महायुतीवर विश्वास ठेवला. आज त्या विश्वासाला उत्तर दिलं जात आहे. मी यापूर्वी शब्द दिला होता की ज्या दिवशी पाणी पोहोचेल, त्या दिवशीच मी इथे सभा घेईन आज तो दिवस आहे. ही केवळ सभा नाही तर जनतेच्या आश्वासनपूर्तीची साक्ष आहे.

डॉ सुजय विखे म्हणाले की,अमोल खताळ यांनी हा संपूर्ण भाग पाणीदार करण्यासाठी जिद्दीने पाठपुरावा केला. जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हा भाग आता जलसमृद्ध होतोय. त्यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली याचा सार्थ अभिमान आहे.

नीलमताई खताळ म्हणाल्या, वर्षानुवर्षं महिलांनी पाण्यासाठी होरपळ सोसली. आज त्या प्रतीक्षेला न्याय मिळाला आहे. सुजय दादांनी आणि नामदार विखे पाटील साहेबांनी दिलेला शब्द आमदार अमोल भाऊंनी खरा करून दाखवला आहे. तालुका त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

ज्येष्ठ नेते भीमराव चतर यांनी विरोधकांना लक्ष करत सांगितले की ,कै. बाळासाहेब विखे पाटलांवर टीका करणाऱ्यांनी चार दशके काय केले? आज विकासकामचं उत्तर जनतेसमोर आहे. पाणी हा हक्क आहे, नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आले.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाषणाच्या शेवटी एक खास विनंती करत सांगितले,नीलम ताईंनी आमदार अमोल भाऊंना सांगावे, की आम्ही विधानसभेत पाण्याविषयी विचारलेले प्रश्न अजूनही उत्तराशिवाय आहेत. ती भाषणे घेऊन यशोधन कार्यालयात पोहोचवावीत, जेणेकरून आम्हाला त्यांची उत्तरं मिळतील.

ही जलक्रांती केवळ विकासाचे प्रतीक नाही, तर सत्तांतरानंतर जनतेच्या अपेक्षांना मिळालेलं ठोस उत्तर आहे. महायुतीच्या नेतृत्वात संगमनेर तालुका जलस्वावलंबनाच्या दिशेने पुढे जात आहे. पाणी, रस्ते, शेती, शिक्षण, आरोग्य या साऱ्या क्षेत्रांतील कार्यक्षम नेतृत्वच खरा विकास घडवू शकते, असा ठाम विश्वास डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ऑप्टिकल भ्रम व्यक्तिमत्व चाचणी: स्त्री की झाडे? तुम्ही सर्जनशील किंवा संवेदनशील आहात की नाही...

काहीवेळा, आपण ज्या प्रकारे गोष्टी पाहता त्या आपल्याबद्दल आपल्या लक्षात येण्यापेक्षा अधिक सांगते. हेच एक ऑप्टिकल भ्रम व्यक्तिमत्व चाचणी इतके विचित्रपणे आकर्षक...

अहिल्यानगर एज्युकेशन ट्रस्टने पुण्यातील 2 कनिष्ठ महाविद्यालये पाच वर्षांपासून बनावट मान्यतांवर चालवली, चार गुन्हे...

एज्युकेशनल ट्रस्टने खोटे सरकारी आदेश आणि बनावट मान्यता दिल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे पुणे : विमाननगर आणि हडपसर येथे कार्यरत असलेल्या दोन कनिष्ठ...

केन विल्यमसनपासून विराट कोहलीपर्यंत: 4 दिग्गज फलंदाज जे 10K कसोटी धावांपासून कमी पडले |...

विराट कोहली आणि केन विल्यमसन (AP/PTI) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केन विल्यमसनच्या निवृत्तीने कसोटी क्रिकेटमधील सर्वात खास टप्पे: 10,000 धावांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.न्यूझीलंडच्या...

लष्कराने जड शस्त्रास्त्रांची मागणी केल्यानंतर जोरावर लाइट टँकला 2 वर्षांचा विलंब झाला

भारताच्या नवीन लाइट टँक जोरावरची उच्च उंचीवर यशस्वी चाचणी घेण्यात आली (फोटो: टाईम्स नाऊ) भारताचा जोरावर लाइट टँक कार्यक्रम - एक DRDO-L&T प्रयत्न...

8 खाद्यपदार्थ डॉक्टर शांतपणे सुपरमार्केटमधून खरेदी करणे टाळतात

बरेच डॉक्टर सोडा, गोड बर्फाचा चहा, बाटलीबंद फ्रूट ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्स यांना पहिली गोष्ट मानतात, कारण ते नाटकीय आहेत म्हणून नाही तर ते...

error: Content is protected !!